Thursday, September 19, 2024
Homeचंद्रपुरलॉ कॉलेज ते हॉटेल ट्रायस्‍टार पर्यंतचा रस्‍ता विकास आराखडयातुन पुर्ण वगळणार

लॉ कॉलेज ते हॉटेल ट्रायस्‍टार पर्यंतचा रस्‍ता विकास आराखडयातुन पुर्ण वगळणार

१५ दिवसात प्रस्‍तावाला अंतिम मंजूरी देणार – प्रधान सचिव भूषण गगराणी

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आढावा बैठक

चंद्रपूर महानगरातील लॉ कॉलेज ते नेहरूनगर पर्यंतच्‍या रस्‍त्‍याचे
मोजमाप करून किती मीटर रूंदीचा रस्‍ता होवू शकतो याबाबतचा अहवाल मनपा
आयुक्‍तांनी ७ दिवसाच्‍या आत सादर करावा, लॉ कॉलेज ते कुंदन प्‍लाझा
पर्यंतचा रस्‍ता पूर्णपणे वगळण्‍यात येणार असून येत्‍या १५ या
प्रस्‍तावाला अंतिम मंजूरी देण्‍यात येईल, असे आश्‍वासन नगरविकास
विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांना दिले.

चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील बाह्यवळण रस्‍ता विकास आराखडयातुन
वगळून त्‍याखालील जागा निवासी विभागात समाविष्‍ट करण्‍याबाबत विधीमंडळ
लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार
यांच्‍या अध्‍यक्षतेखाली विधानभवन मुंबई येथे २१ ऑक्‍टोंबर रोजी आढावा
बैठक संपन्‍न झाली. या बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण
गगराणी, उपमहापौर राहूल पावडे, मनपा आयुक्‍त राजेश मोहीते, नगरसेवक सुभाष कासनगोटूवार आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. महाराष्‍ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचनाअधिनियम १९६६ च्‍या कलम ३७ (१) अन्‍वये फेरबदलाच्‍या प्रस्‍तावासंदर्भात
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आढावा घेतला.
चंद्रपूर शहराच्‍या उत्‍तर बाजूला हॉटेल ट्रायस्‍टारपासून- ताडोबा रोड-लॉ कॉलेज-मुल रोडपर्यंतचा ६०मीटर रूंदीचा व सुमारे ५ किमी लांबीचा विकासयोजना बाहृयवळण रस्‍ता विकास आराखडयातून वगळून त्‍या खालील जागा निवासी प्रभागात समाविष्‍ट
करण्‍याबाबतची कार्यवाही प्राधान्‍याने पूर्ण करण्‍याचे निर्देश आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिले. यासंदर्भात लॉ कॉलेज ते नेहरू नगर पर्यंतच्‍या रस्‍त्‍याचे मोजमाप करून किती मीटर रूंदीचा रस्‍ता होवू शकतो ते मनपा आयुक्‍तांनी ७ दिवसात कळवावे, असे निर्देश प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी दिले. लॉ कॉलेज ते हॉटेल ट्रायस्‍टार हा रस्‍ता पूर्ण
वगळण्‍यात येणार असून याबाबतच्‍या प्रस्‍तावाला अंतिम मंजूरी येत्‍या १५दिवसात देण्‍यात येईल, असे आश्‍वासन प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी दिले.
या बैठकीला पुरूषोत्‍तम सहारे, वसंतराव धंधरे, मनोहर कोहळे, गजानन भोयर,
हरीशचंद्र धांडे, संजय कोत्‍तावार, अमोल तंगडपल्‍लीवार, प्रकाश बागडदे,
शंकरराव गौरकार यांची ही उपस्थिती होती.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular