घुग्घुस येथील लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड अंतर्गत लॉईड्स इनफिनिट फॉउंडेशन तर्फे परिसरातील म्हातारदेवी, शेनगाव, उसगांव व घुग्घुस या गावातील २१ आवश्यक गोरगरीब विद्यार्थांना स्व.जगन्नाथ जोगी अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,(ITI) घुग्घुस येथे विद्यार्थी,विद्यार्थींनी निशुल्क शिक्षण देण्यात येत आहे.
जोगी (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य श्री.उदय मोहितकर आपले मनोगतातून सांगितले की,संस्थेला १९९३ वर्षाला सुरू झाली,असून जवळपास २५ ते ३० वर्ष झाली आहे,विद्यार्थी वेगवेगळ्या व्यवसायमध्ये प्रवेश घेतात, आणि चांगल्या पद्धतीने पास होवुन रोज़गार, संयम रोज़गार करतात, त्या पद्धतीने यावर्षी २०२३ ला पहिल्यांदाच लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीने आमच्या जवळ प्रस्ताव टाकला की,ते काही परिसरातील खेळे गावे आहेत, तसे गोरगरीब विध्यार्थी आहे,ते आपल्या आर्थिक परिस्थिती पाही शिक्षण घेवु शकत नाही,तर अशा विद्यार्थांना आम्ही मदत करणार आहो,आणि त्यांना शिक्षण देवुन त्यांच भविष्य बनवनार आहो अशा आम्ही प्रयत्नशील करीत आहे,या ठिकाणी आपली सहाय्यता पाहिजे,तर आम्ही त्यांना सहकार्य केले.आणि त्यांनी म्हतारदेवी, शेनगाव, उसगांव व घुग्घुस येथील जे काही गोरगरीब विद्यार्थी होते,जे आर्थिक नसल्याने शिक्षण घेवू शकत नव्हते,अशा विद्यार्थांना दत्तक घेतले,आमच्याकडे त्यांचे प्रवेश निश्चित केले,आणि त्यांची संपूर्ण जवाबदारी १ व २ वर्षाचा शिक्षणचा कोर्स असेल त्या कोर्सचा सर्व जवाबदारी लाॅईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड अंतर्गत लॉईड्स इनफिनिट फॉउंडेशन तर्फे सी.एस.आर निधीतून उचली आहे.
तसेच सी.एस.आर व्यवस्थापक नम्रपाली गोंडाणे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शनात सांगितले की,हा आमचा सी.एस.आर च्या उपक्रम होता,सध्या हा औद्योगिक प्रशिक्षणचे (ITI) हा म्हणजे सध्याची गरज आहे, या देशांमध्ये तांत्रिक शिक्षणाची खूप गरज आहे,लाइट्स मेटल्स उद्योग व लाइट्स इन्फिनिट फाउंडेशन तर्फे तुमच्यासाठी केले,आहे ज्यापण ट्रेड मध्ये प्रवेश झाले आहे,त्यांनी योग्य रितीने रोज कालेज मध्ये येवुन सरांचा मार्गदर्शनात शिक्षण घेवून तुम्ही चांगल्या मार्कांनी पास होवुन यशस्वी होवा.आमचा कंपनीने तुम्हाला छोटीशी मदत केली आहे,त्यांचे तुम्ही चांगले फायदे करुन घ्या समोर भविष्यात मोठे हवा, आई-वडीलाचे नाव रोशन करा,चांगले मार्गाला लागा समोर हेच माझी अपेक्षा आहे. व तसेच आयटीआय प्रवेशाद्वारे स्थानिक तरुणांसाठी कौशल्य विकास वाढवणे
२१ विद्यार्थ्यांची( ITI) कॉलेज प्रवेशासाठी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
यावेळी सी.एस.आर व्यवस्थापक नम्रपाली गोंडाने, प्राचार्य उदय पी.मोहितकर, प्रभाकर मोहितकर, प्रकाश मोहितकर, मनोज पिंपळकर, सहाय्यक सीएसआर अधिकारी रतन मेडा तसेच कर्मचारी व मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.