केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कडे मागणी चे दिले निवेदन.
गडचांदुर.मो.रफिक शेख – दिवसेंदिवस वाहनाची संख्या वाढत आहे त्यामुळे अपघात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.करीता काही पर्याय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याचे कडे निवेदनाच्या माध्यमातून सुचविले तथा मागणी सुद्धा केली आहे.नितीन गडकरी साहेब जेव्हा पासून रोड ट्रानस्पोरट मंत्री झाले तेव्हा पासून रोड दुरुस्ती चे कामात नवीन रोड बनवण्याचे कामात मोठी चालना मिळाली असून रोड चे कामे प्रगती पथावर आहे.यात शंका नाही मात्र अपघात ही एक मोठी समस्या आहे अश्या अपघाता मुळे कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे करीता जनहितैसी इबादुल सिद्दीकी यांनी मागणी केली आहे की ज्या प्रमाणे रोड बनविताना चार चाकी वाहन फोर लेन टू लेन रस्त्यावर पईदल चालण्या साठी वेगळी जागा सोडली जाते त्याच प्रमाणे मोटर सायकल साठी सुधा थोडी जास्त जागा सोडून व्यवस्था असावी याच्या या मागणीने मोटारसायकल अपघात कमी होईल या रास्त मागणी कडे गडकरी साहेब लक्ष देण्याचे बोलले असून त्यांनी या सूचनेचे स्वागत केले आहे.दर वर्षी या अश्या अपघातात वय 19 ते 36वर्ष वयाच्या व्यक्ती चे प्रमाण अधिक आहे .याला आळा बसेल असे सिद्दीकी चे म्हणने आहे. आपल्या सूचना चागल्या आहेत. सूचना एकूण घेतल्याबद्दल सिद्दीकी यांनी त्याचे आभार मानले