घटना स्थळी रामनगर पोलीस उशिरा आल्याने नागरिकांमध्ये नाराजी
चंद्रपूर : रामनगर पोलीस ठाण्यातील अजयपूर च्या काही अंतरावर असलेल्या मूल रोड वरती भीषण अपघात झाल्याने चार युवकांच्या घटना स्थळीच मृत्यू झाला व एक गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
चंद्रपूर शहरातून हे पाचही युवक युवती वाढदिवस साजरा करून मूल ला परत जात असतांना हा अपघात झाला असून यामध्ये मूल चे सर्व प्रतिष्ठित लोकांचे मूल असल्याचे बोलले जात आहे. अजयपूर हद्द ही रामनगर पोलीस ठाण्यात येत असून घटना स्थळी पोलीस प्रशासन वेळेवर आले नसल्यामुळे या परिसरात पाहणार्यांची मोठी गर्दी झाली होती व यातून मोठी दुर्घटना पुन्हा होऊ शकली असती हे विशेष.
मूल शहर दुखाचा सावटात मंगळवारी राञौ १०.३० वा. च्या सुमारास अजयपुर जवळ झालेल्या भिषण अपघाता मध्ये मूल शहरातील वेगवेगळ्या चार प्रतिष्ठीत कुटूंबातील चार युवकांचा मृत्यु झाला यामध्ये राजुभाऊ पटेल आणि सलीम शेख यांचे प्रत्येकी एक असे दोन मूले आणि विष्णु उधवाणी आणि निमगडे शिक्षक यांचे प्रत्येकी एक प्रमाणे दोन मूलीचा समावेश आहे . या चारही जणांना घटनास्थळीच मृत्युने कवटाळले. हिरेणभाऊ शाह (गोगरी) यांचा मूलगा योग गोगरी गंभीर जखमी असून हे पाचही जण चंद्रपूर वरून वाढदिवस साजरा करून येत होते. त्याच वेळी शेतामधुन निघणाऱ्या ट्र्ँक्टरने या पाचही जणांच्या घात केल्याने मूल शहर दुखाचा सावटात ओढवले आहे .