राजुरा: दि.२७ राजुरा येथील हनुमान नगर ते चुनाळा या मुख्य मार्गाचे काँक्रीटीकरनाचे काम मागील एक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे सदर कामाकरिता टाकण्यात येत असलेली गिट्टी इतरत्र पसरत असल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत असून या मार्गावर लहान मोठे अपघात सुध्दा होत आहे जड वाहतुकीमुळे उडणाऱ्या धुळीचे प्रदूषण वाढले आहे त्यामुळे दिवसातून तीनदा नियमित पाण्याचा मारा करावा अशी मागणी बामनावड्याचे माझी उपसरपंच सर्वानंद वाघमारे यांनी बांधकाम विभागाकडे केली आहे.

मागील वर्षांपासून चुनाळा मार्गावरील रस्त्याचे काँक्रीटीकरण संथगतीने सुरू आहे सदर कामाकरिता टाकण्यात आलेली गिट्टी जडवाहतुकीने रस्त्यावर पसरत चालली असल्याने बाईकधारकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे या मार्गावर महान मोठे अपघात सुध्दा घडत आहे
या मार्गावर जडवाहतुक मोठ्या प्रमाणात चालत असल्याने विवेकानंद नगर,बिरसामुंडा नगर, तक्षशिला नगर,स्नेहदीप नगर,अंगदनगर आदी वस्त्यांमध्ये धुळीचे साम्राज्य पसरले असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे तरी दिवसातून तीनदा या मार्गावर टँकरने पाण्याचा मारा करावा अशी मागणी उपसरपंच सर्वानंद वाघमारे,बबन मडावी, नागराज पाल,दिनेश मेश्राम,निखिल सातपुते, दिनेश भोंगळे, गजानन उरकुडे, व्ही.आर.कोवे यांनी केली आहे