ब्रह्मपुरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या रनमोचन ग्रामपंचायत तर्फे बांधण्यात आलेले सार्वजनिक शौचालय कालावधी अगोदरचजमीनदोस्त झाल्याने बांधकामावर शंका निर्माण होत आहे. सन 2002 मध्ये सार्वजनिक शौचलयांचे .

बांधकाम लाखो रुपये खर्च करून करण्यात आले त्यासाठी लोकवर्गणीतून चाळीस टक्के रक्कम शासकीय खात्यात जमा करण्यात आली मात्र कालावधी अगोदरच हे शौचालय जमीनदोस्त झाल्याने निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आले असावे असाअंदाज व्यक्त करण्यात येत असून त्वरित दुरुस्ती करून किंवा नव्याने शौचालय उभे करावे अशी मागणी रणमोचन येथील ग्रामस्थांनी केली आहे..