आठ दिवसा अगोदर कोराजन व लिजंड औषधाची फवारणी
ब्रह्मपुरी: ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या धान पिकावर मोठ्या प्रमाणात खोडकिडा रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून एफ एम सी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने विविध प्रकारच्या अळया नियंत्रण ठेवण्यासाठी रण मोचन येथील शेतकरी दिगांबर आनंदराव राऊत यांच्या शेतात आठ दिवसा अगोदर कोरोजन व लीजंट डेमो औषधाची फवारणी करण्यात आली आज दिनांक 19 नोव्हेंबरला शेतातील फवारणी करण्यात आलेल्या पिकाची पाहणी करण्यात आली असता असलेल्या रोग कमी झाला असल्याचे दिसून आले शिवाय धान पीक हिरवे कच्च दिसत असून मुळांची पतसुद्धा आकाराने मोठे झाले असल्याचे दिसून आले यावेळी रण मोचन येथील पंचवीस-तीस शेतकरी उपस्थित होते.

यावेळी एम एस सी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी च्या प्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांना कोराजन व लीजंट औषध वापरण्याबद्दल विविध मार्गदर्शन केले यावेळी एफ एम सी चे कीर्तिमान मसराम पंकज चौधरी श्रीकांत लवकर प्रफुल चांमारे रोषण वराडकर अमित मेश्राम यांची उपस्थिती होती सदर कंपनीचे उपक्रम राबविल्या बद्दल शेतकऱ्यांनी अभिनंदन केले