बल्लारपूर (राहुल गायकवाड)
शहरात दररोज शंभर ट्रक्टर रेती ची गरज असते व ती रेती तस्कर सहजरित्या पुर्ण करित असतात एक ट्रक्टर चार ते पाच हजार रूपयात विकली जात असल्याने महिण्याकाठी रेतीची उलाढाल ही लाखो रुपयाचा घरात जात आहे.
रेती तस्कर नविन -नविन शक्कल लढवित रेती तस्करी करित असतात. व खूल्लेआम मेन रोड वरुन रेती तस्करी होत असताना संबधीत विभाग हा डोळेझाक पणा का करित असतो ? हा मोठा प्रश्न पडला आहे.
“ताना” नावाचा तस्कराचा दबदबा

” ताना” नावाचा रेती तस्कर हा तर खूल्लेआम तस्करी करीत असतो, त्याचावर कार्यवाही करण्यास संबधीत विभागाचा विशेष आशीर्वाद असल्याचे समजतो, टेकडीवरचा हा मुख्य तस्कर येथील इमारत सामूग्री विकणारे ट्रेडर्स ला हवी तेव्हढी रेती देतो व हे ट्रेडर्स अव्वा चा सव्वा दराने रेती विकतात .या तस्करी त लाखो रूपयांची उलाढाल महिण्याकाठी होत असते, शासनाचा महिण्याकाठी लाखोरुपये महसुल डुबविण्यात शासनाचे कर्मचारी जबाबदार आहेत या सर्व प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे.
टेकडी वरचा बील्डींग सप्लायरचा रेती चा मोठा स्टाक
टेकडीवर असलेला हा बिल्डींग सप्लायर रेती तस्करी कडुन रेती घेऊन त्याची विक्री चढ्या दराने करित असतो त्या माध्यमातुन त्याने लाखो रुपयाची माया जमविली .सुरुवातीला कीराणा दुकान लावले मात्र त्याचा काळा धंदा करता येत नसल्याने त्याने बांधकाम क्षेत्रात उडी मारली व बघता बघता लाखो रुपयाची संपत्ती अल्पावधीत जमविली. त्याने मौलाना आझाद वार्डात जागा घेऊन तिथे अवैधरित्या रेती चा स्टाक करतो वव चढ्या दराने रेती विकत असतो.
आयकर विभागाने धाड टाकल्यास मोठे घबाड मीळण्याची शक्यता
आयकर विभागाने या तथाकथीत बिल्डींग रॉ सप्लायर वर धाड टाकली तर लाखो रुपयाची अवैध संपत्ती मीळण्यास वेळ लागणार नाही . ग्राहकाला लूटणार्या या अवैध रेती विक्रेत्यांवर आयकर विभागाची केव्हा वक्र दुष्टी पडणार हा प्रशन शहरवासीयांना पडला आहे.
एक ट्रक्टर चार ते पाच हजार रूपयाने विकली जाते, दररोज अंदाजे शंभर ट्रक्टर विकल्याजात असतील तर दररोज चार ते पाच लाख रूपयाचा अवैध व्यवसाय तर महिण्याकाठी करोड रुपयाचा घरात हा व्यवसाय जात असून हे सर्व नुकसान शासनाचे होत आहे.व याला जबाबदार संबधीत विभागाचे कर्मचारी च असल्याची चर्चा शहरात आहे .
“तान्हा” वर अंकुश लावने जरुरी असून तान्हा सारखे प्रत्येक ऐरीयात मुख्यख तस्कर अनेक आहेत त्यांनाही जेरबंद केल्याशीवाय व संबधीत कर्मचार्यावर फौजदारी कार्यवाही केल्याशीवाय एव्हढी मोठी अवैधरित्या रेतीची तस्करी थांबणार नाही हे मात्र सत्य!