ब्रम्हपूरी:
महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक शिक्षण मंडळ सिंदेवाही द्वारा संचालित महात्मा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मेंडकी येथे दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी “हळदी कुंकू व स्नेह मिलन”या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका डॉ.सौ.सरिताताई ढोले या होत्या. तर कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मेंडकी ग्रा.पं.च्या सरपंच सौ. मंगलाताई ईरपाते,ब्रह्मपुरी पं. स.च्या माजी सभापती सौ.वंदनाताई शेंडे ,म.गां.तंटामुक्त समितीच्या अध्यक्षा सौ.रजनीताई भोयर,पं. स.च्या माजी उपसभापती सौ.रजनीताई आंबोरकर, सौ. कल्पनाताई बोरुले माजी ग्रा.पं.सदस्या, आणि सौ.छायाताई बावणे इ. मान्यवरसह सौ. डिम्पलताई आंबोरकर, सौ.प्रितीताई आंबोरकर, सौ. संगीताताई आंबोरकर, सौ.धनश्रीताई कसारे, सौ.मनीषाताई आंबोरकर,सौ. किरणताई बोरूले यांचेसह जवळपास शंभर महिलांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
या कार्यक्रमासोबतच पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या "बेटी बचाओ बेटी पढाओ" या अभियाना अंतर्गत दिपावलीच्या वेळी "हर घर रांगोळी" स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत विद्यालयातील अनेक विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. त्यापैकी पाच उत्कृष्ट रांगोळी सादर करणाऱ्या विद्यालयातील मुलींचा प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले .
याप्रसंगी संस्थेच्या संचालिका व कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. सौ.सरिताताई ढोले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, "तिळगुळासारखा गोडवा सर्वांचे आयुष्यात नेहमी कायम राहावा व महिलांनी सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असावे व विद्यार्थिनींनी स्पर्धेत सातत्याने भाग घेत राहावे" तसेच पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित सौ. वंदनाताई शेंडे यांनी स्त्रियांना समाजात कसे मानाचे स्थान आहे,हे पटवून दिले. सरपंचा सौ. मंगलाताई ईरपाते, सौ.रजनीताई भोयर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनानंतर डॉ.सौ. सरिताताई ढोले यांच्यातर्फे सर्व महिलांना "तीळ गुळ" आणि "वाण" देण्यात आले.अशा प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात "हळदीकुंकू" व "स्नेह मिलन कार्यक्रम" मोठ्या हर्षोल्लासात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे संचालन,आभार प्रदर्शन कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा.कु.तृप्ती खोब्रागडे यांनी केले.