गडचांदूर-

महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे स्टॉप कॅन्सर मिशन च्या वतीने कॅन्सर जनजागृती शिबिर चे आयोजन नुकतेच करण्यात आले होते,या शिबिरात स्टॉप कॅन्सर मिशन चे समन्वयक अजय ठाकरे यांनी कॅन्सर आजारासंबंधी उपयुक्त माहिती दिली, कॅन्सर होण्याची कारणे,त्या ची लक्षणे,तो होऊ नये म्हणून करावयाची उपाययोजना, आणि कॅन्सर झाला तर काय करावे, याबद्दल सविस्तर माहिती दिली, अध्यक्ष स्थानी प्राचार्या स्मिता चिताडे होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य विजय आकनूरवार,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक हनुमान मस्की,शोभा जीवतोडे होत्या, शिबिरात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते