गडचांदूर,,
महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उपप्राचार्य विजय आकनूरवार होते,प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक अनिल काकडे,एम,सी, व्ही, सी, विभागाचे प्रमुख प्रा, अशोक डोईफोडे, जेष्ठ प्राध्यापक प्रफुल्ल माहुरे,उपस्थित होते,
सर्वप्रथम संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली,
प्रा, चेतना कामडी यांनी संत जगनाडे महाराज यांच्या जीवन चारित्र्य वर प्रकाश टाकला, प्रास्ताविक अनिल काकडे यांनी केले, संचालन प्रा, चेतना कामडी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा, उमेश राजूरकर यांनी केले, याप्रसंगी प्रा,प्रदीप परसुटकर,प्रा, प्रशांत पवार,प्रा, संगीता गिरी,प्रा, प्रगती आगे, प्रा, सुरेखा झाडे,सुभाष खुजे उपस्थित होते