भद्रावती- अखिल भारतिय ग्राहक पंचायतीच्या भद्रावती शाखेतर्फे येथील हुतात्मा स्मारक येथे राष्ट्रीय ग्राहक दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी अखिल भारतिय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष मधुसूदन भुमकर,तर प्रमुख पाहुणे म्हणुन भद्रावती नगपरिषदेचे मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपणी भद्रावतीचे उप अभियंता सचिन बदखल, सहा. पोलिस निरीक्षक सुधीर वर्मा, विवेकानंद महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. उमाटे, महिला सदस्य सौ. भुमकर यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी शोषनमुक्त समाज निर्मितीसाठी ग्राहक पंचायतीची भुमीका मांडली.बदखल यांनी विजबील व ग्राहकाच्या समस्या आणि कर्तव्य यावर मार्गदर्शन केले. मुख्याधिकारी यांनी ग्राहक संरक्षण कायदा आणि ग्राहकांचे हक्क याबद्दल माहीती दिली. महिला सदस्य सौ. भुमकर यांनी महिला हक्क व कायदे याबद्दल मार्गदर्शन केले. वामन नामपल्लीवार यांनी ग्राहक संरक्षण कायदा, त्याची व्याप्ती व कायद्यात झालेले नवीन बदल याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तम घोसरे यांनी केले, संचालन वामन नामपल्लीवार, वार्षिक कार्याचे अहवाल वाचन अशोक शेंडे तर आभार प्रदर्शन पुरूषोत्तम मत्ते यांनी केले.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्रविण चिमुरकर, वसंत व-हाटे, गुलाब लोणारे, गोपिचंद कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाला संपुर्ण सदस्य तथा ग्राहकांची उपस्थिती होती.