Saturday, July 27, 2024
Homeचंद्रपुरब्रह्मपुरी शहराजवळील उदापूर येथील अखेर ते वादग्रस्त अतिक्रमण प्रशासनाने पाडले.

ब्रह्मपुरी शहराजवळील उदापूर येथील अखेर ते वादग्रस्त अतिक्रमण प्रशासनाने पाडले.

ब्रम्हपुरी :- ब्रह्मपुरी उदापूर येथील संताजी बोळीत एका व्यक्ती ने शासकीय जागेवर अतिक्रमण करून दुमजली पक्की इमारत उभी केली होती. मात्र जनभावणेचा क्षोभ तथा येथील पत्रकार दिवाकर मंडपे यांनी आमरण उपोषण सुरू करताच चौथ्या दिवशी प्रशासनाने ते वादग्रस्त बांधकाम जमीनदोस्त केले.

उदापुर येथील संताजी बोळीतील पाणी गावातील पाणी पातळी कायम ठेवण्यास तसेच जनावरांना सुद्धा पाण्याची तहान भागविण्यासाठी उपयुक्त होती. मात्र गावातील एका व्यक्ती ने त्या बोळीत अतिक्रमण करून तिथे पक्के बांधकाम केले. याबाबत गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार दिवाकर मंडपे यांनी स्थानिक ग्रामपंचायत तथा येथील तहसीलदार उषा चौधरी यांना वारंवार निवेदन दिले पण त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आली. तहसीलदार उषा चौधरी यांनी तर दिवाकर मंडपे यांना आपल्या कार्यालयातून अक्षरशः अपमानास्पद बोलून हाकलून लावले. मात्र दिवाकर मंडपे यांनी हार न मानता उदापुर ग्रामपंचायत तथा तहसीलदार यांच्या विरोधात संताजी बोळी समोर मंडप टाकून आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणाच्या तिसऱ्याच दिवशी महसूल विभागाने तातडीने दखल घेत सदर अतिक्रमित बांधकाम तोडले. सदर अतिक्रमण तोडल्याने सत्याची बाजू जिंकली आणि मदमस्त प्रशासनाची चांगलीच जिरली अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular