राज्यस्तरीय पर्यावरण परिषद-२०२० मालेगावं,नाशिक येथे विशेष सत्कार
(वार्ताहर)अर्हेरनवरगाव:-
महाराष्ट्र शासन-छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त असलेली “निसर्ग मित्र समिती, आणि ग्रा.पं.टेंभे, जिल्हा नाशिक” यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आपल्या राज्यातील विविध क्षेत्रातील गुणिजन व्यक्तींना, उत्कृष्ट कार्याबद्धल राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार देण्यात येत असतो.

मागील ६ वर्षांमध्ये सामाजिक क्षेत्रात अनेक उल्लेखनीय कार्य केल्याबद्धल, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी मधील मा.उदयकुमार सुरेश पगाडे यांना आज नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय पर्यावरण परिषद मध्ये “महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार-२०२०” देऊन त्यांच्या सामाजिक सहकारी संदीप नाकतोडे, पुनम कुथे यांच्यासह गौरविण्यात आले.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा.तुषार शेवाळे संस्थापक,एम.व्ही.पी संस्था नाशिक,विशेष अतिथी डॉ.प्रतापराव दीघावकार वरिष्ठ पोलीस महानिरीक्षक, नाशिक,नाशिक पदवीधर संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे , शिक्षक म.सं.आमदार, मा.किशोर दराडे आदी मान्यवर उपस्थित होते.