Wednesday, April 24, 2024
Homeचंद्रपुरब्रम्हपुरी येथील बारई तलावात घाणीचे साम्राज्य

ब्रम्हपुरी येथील बारई तलावात घाणीचे साम्राज्य

:- तलावातील घाणीच्या साम्राज्याला जबाबदार कोण?
:- डेंग्यू रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता….
ब्रम्हपुरी:-

ब्रम्हपुरी शहरातील मध्यवती ठिकाणी असलेल्या बारई समाजाचे तलाव आहे. त्या बारई तलावामध्ये शहरातील काही भागातील सांडपाणी जाते परंतु त्या बारई तलावामध्ये कुठल्याही प्रकारचे पाणी शुध्दीकरण यंत्र आता पर्यंत बसविण्यात आले नाही. त्यामुळे या बारई तलावामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यांची मोठी दुर्गंधी त्या ठिकाणी येत असल्यामुळे आजुबाजूच्या लोकांना व रोड नी येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे, तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य असुन सध्या मच्छरांची उपत्ती यामधुन मोठी शंका निर्माण झाली आहे. सध्या शहरात डेंग्यू रोगाचा प्रसार होताना दिसत असताना शहरात अशा प्रकारे एका मध्यस्थी असलेल्या तलावामध्ये घाणीचे साम्राज्य असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष करण्याची गरज असल्याचे नागरिकांत चर्चा सुरू आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular