Friday, April 19, 2024
Homeचंद्रपुरब्रम्हपुरी नगरपरिषदेचा भोंगळ कारभार, कचरा व्यवस्थापन केंद्रात मोठा घोळ

ब्रम्हपुरी नगरपरिषदेचा भोंगळ कारभार, कचरा व्यवस्थापन केंद्रात मोठा घोळ

शिवसेना (शिंदे गट)कडून पत्रकार परिषदेत खळबळजनक आरोप

ब्रम्हपुरी :-
ब्रम्हपुरी नगरपरिषद प्रशासन सर्वसामान्य जनतेसाठी नेमके आहे तरी काय..? सध्या असा प्रश्न सर्वसामान्य ब्रम्हपुरीकर जनतेसमोर उभा ठाकला आहे.शिवसेना(शिंदे गट)तालुकाप्रमुख श्री नरेंद्र नरड व कार्यकर्त्यांनी शुक्रवार रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत चक्क ,साधारण गोर गरीब मजूरी काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची मजुरी व हक्क नगरपरिषद प्रशासन गिळंकृत करत असल्याच्या आरोपाने शहरात खळबळ माजली आहे.

शिवसेना ( शिंदे गट ) पक्षाचे पदाधिकारी यांनी स्थानिक विश्राम गृहात पत्रकार परिषद घेत नगरपरिषद प्रशासनावर आरोप केलेत की, आम्ही ब्रम्हपुरी घणकचरा व्यवस्थापन केंद्र येथे मजुराच्या न्याय , हक्कासाठी व नागरिकांचे आरोग्य दृष्टीने भेंट दिली असता कचरा संकलन केंद्रातील मजुरांवर अन्याय व आर्थिक लूट होत तसेच नागरिकांच्या आरोग्याशी नगरपरिषद प्रशासन खेळत असल्याचे दिसून आले आहे. कचरा संकलन केंद्रात काम करणाऱ्या मजुरांना मूळ आधारभूत मजुरी मिळत नसून सदर रक्कमेत होणारी हेराफेरी आढळून आली . मजुरांना नाममात्र मजुरी देते नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्याकडून वयक्तिक कामासाठी राबवले जात असून त्यांच्या नैतिक अधिकार हक्काचे उलंघण वारंवार केल्या जात आहे . कचरा संकलन ठेकेदार मजुरांना देण्यात येणाऱ्या रक्कमेचा लाभ लाटण्यासाठी मजुराकडून कोऱ्या विड्रॉल वर सही करून घेत स्वतः उचल करीत आहेत . कचरा संकलन ठेकेदार परस्पर व काही नगरपरिषद कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कचरा संकलन केंद्रातील किमती वस्तू लंपास करीत आहेत . कचरा संकलन केंद्राची कंपाउंड वॉल किल्लेक जागून खचलेली व कमी उंचीची असल्याने कचरा बाहेर पडून असतो , सदर क्षेत्र नागरी रहिवास क्षेत्र असून नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याने तातडीने उपाय योजना करण्यात याव्यात . आर्थिक गुन्हे , सामानाची हेराफेरी , कामचुकारपणा व मजुरांच्या हक्काचे हनन करणाऱ्या कचरा संकलन केंद्रातील ठेकेदाराकडून तातडीने ठेका काढून घेत सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे . तसेच नगर परिषद ब्रहमपुरी अंतर्गत कचरा संकलन अंतर्गत येणारे शासकीय महत्वाचे साहित्य व आवश्यक वस्तू तसेच टाकाऊ वस्तू कचरा संकलन केंद्रातील कर्मचारी श्री दुधाराम बेदरे व इतर कर्मचारी परस्पर संगणमत करून भंगार भावात विक्री करून शासनाला आर्थिक भुदंड लावत असल्याची माहिती मीळाली करिता तात्काळ संबंधित कर्मचारी व ठेकेदार विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा.अश्या खळबळ जनक आरोपाने शिवसेनेने स्थानिक विश्राम गृहातली पत्रकार परिषद गाजवली तर नगरपरिषद प्रशासनावर होणारे नियमित आरोप व बदनामी बघता आता साधारण गोर गरीब मजुराची मजुरी गिळंकृत करण्याच्या आरोपाने शहरातील नागरिक अचंभित झाले आहेत

मागणीची दखल लवकरात लवकर घेण्यात यावी अन्यथा शीवसेना( शिंदे गट )पक्षा तर्फे आंदोलन छेडण्यात येइल.असे पक्ष्याच्या वतीने ठणकावण्यात आले असून सदर पत्रकार परिषदेला शिवसेना (शिंदे गट)तालुकाप्रमुख श्री नरेंद्र नरड,श्री डॉ सागर माकडे, शहर अध्यक्ष अमोल माकोडे,भाग्यश्री देवगडकर, अल्का शेंडे, सुनीता येरमा, रवींद्र देवगडकर,सुमेदा येरमा, प्रभाकर आंबोरकर,शुभम मेश्राम, रवी राऊत, अतिश धोंगडे,प्रवीण लोखंडे, दीपक उपरीकर, लोकेश गणवीर व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular