ब्रम्हपुरी -आरमोरी रोडवर रेल्वेचा रूट आहे. आज सायंकाळी 6.30च्या सुमारास आरमोरी कडे गिट्टी भरून जाणारा हायव्हा रेल्वे च्या रूटवर हायवा चे पट्टे तुटल्यामुळे रेल्वे क्रॉसिंगवर गाड्यांचे मोठी लाईन लागल्याने जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. काही वेळाने पोलीस विभागाचे वाहतूक पोलीस लाखे यांनी येऊन येणारा जाण्याचा मार्ग मोकळा करूनदेत होते.
हायव्हा चे पट्टे तुटल्यामुळे रेल्वे फटकावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढू लागली होती. सदर गर्दीही शिवाजी चौकापासून तर अमराई पर्यंत जाम लागलेली होती. रेल्वे रुटच्या दोन्ही बाजूला असलेल्या ब्रेकर मुळे बरेच अपघात झालेले आहेत. त्या ब्रेकर वर पांढऱ्या रंगाचा पट्टा मारून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. किंवा सदर ब्रेकची ऊंची कमी करण्यात यावी. सदर रस्त्याने नेहमीच प्रवाशांची गर्दी असतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज भासत आहे.