Saturday, July 27, 2024
Homeचंद्रपुरब्रम्हपुरीच्या पोलीसंनी कोरोना कोळात केलेल्या कामगीरीचे कौतुक

ब्रम्हपुरीच्या पोलीसंनी कोरोना कोळात केलेल्या कामगीरीचे कौतुक

ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत काम करणाऱ्या ७० पालीस व ४ अधिकाऱ्यांनी कोरोना काळात केलेल्या विशिष्ट कामगिरी बद्दल कौतुक करण्यात आले . ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनच्या आवारात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ठाणेदार मल्लीकाअर्जुन इंगळे यांनी भषविले व प्रमुख अथिती म्हणून मुंबईचे जी.एस.टी. आयुक्त श्री . समीर बजाज उपस्थीत होते .

या कार्यक्रमातंर्गत सर्व स्टाफला प्रत्येकी ४ कि . तांदुळ , १ कि . दाळ , बेसन , ? लीटीर खाण्याचे तेल , बिस्कीट , नाश्ता पॅकेट , मिरची , हळद , मीठ इत्यादी सामुग्रीला एका थैलीत टाकुन वाटप करण्यात आले . या थैल्या श्री . वाय.जी. लाखानी तर्फे देण्यात आल्या . चि . आदित्य समीर बजाज वय वर्ष १५ याने कोरोना काळात आपले नातेवाईक व ओळखीच्या लोकांमार्फत जवळपास १ लाख रु . जमा केले . त्यापैकी ५० हजार रु.चे साहित्य मुंबईतील धारावी व वडाला विभागातील कोरोना पिडीत परिवाराला देण्यात आले . तर उपरोक्त कार्यक्रमाकरीता २५ हजार रु . आदित्य समीर बजाज तर्फे देण्यात आले तर १५ हजार रु . चा खर्च प्रयास बहुद्देशीय संस्था , ब्रम्हपुरी तर्फे करण्यात आले . कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रा . सुभाष बजाज , सौ . आभा समीर बजाज टी.सी.एस. मुबई , श्री . नारायण बोकडे , श्री . हरिश्चंद्र चोले व श्री . नेताजी मेश्राम संपादक ब्रम्हपुरी ब्लास्ट व श्री . निलेश मोहता हजर होते . कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक प्रा . मंजूषा बजाज ने केले योजने ची पूर्ण माहिती आदित्य समीर बजाज व कु . सीमरन समीर बजाज यांनी दिली . श्री . समीर बजाज ने ही आपले मनोगत व्यक्त केले . आपल्या अध्यक्षीय भाषणात ठाणेदार श्री . इंगळे साहेबांनी आदित्य समीर बजाज च्या कार्याचे कौतुक केले व कार्यक्रमाकरीता धन्यवाद दिले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता पोलीस तर्फे श्री . देशमुख मेज़र तसेच ने.ही. कॉलेज ब्रम्हपुरीचे रोशन डांगे , श्री . मोरेश्वर हटवार व सॉल्यंट प्लॅटचे श्री . ब्रम्हो यांनी विशेष परिश्रम घेतले .

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular