चंद्रपूर: शहर महानगरपालिका भानापेठ प्रभाग क्रमांक 11 बगड खिडकी परिसरात बेवारस कुत्र्यांची दहशत पसरलेली आहे.

परिसरात मोठ्या प्रमाणात बेवारस कुत्र आहेत. बेवारस कुत्र्यांच्या दहशतीमुळे भाना पेठ प्रभाग बगड खिडकी परिसरातील लोकांच्या ये जा करणे कठीण झाले आहे . कुत्रे ये-जा करणारे नागरिकांवर भोकत आहे. झपट मारणे, मागे धावणे आणि चावण्याचा प्रयत्न करत आहे.
या कुत्र्यांच्या बंदोबस्त करा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव मोहम्मद कादर शेख यांनी केली .
यासंदर्भात चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त विशाल वाघ महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते आणि मनपा महापौर यांना निवेदन सादर केले यावेळी विधानसभा युवक काँग्रेस विधानसभा सचिव मनू रामटेके, प्रकाश देशभरतार, सलमान पठाण, शादाब खान, रशीद शेख, पप्पु भाई आदी उपसतिथ होते.