Saturday, May 18, 2024
Homeचंद्रपुरबि. एल .ओ.ना निवडणूक प्रक्रियेतुन मुक्त करा

बि. एल .ओ.ना निवडणूक प्रक्रियेतुन मुक्त करा


बि. एल ओ.शिष्टमंडळाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

चिमूर :- १५ जानेवारी २०२१ ला ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूकीची आचारसंहिता सुद्धा लागु झाली आहे. अशातच चिमूर तालुक्यातील शिक्षक बि एल ओ चे काम सांभाळत आहेत. कोरोना संकट काळात ६ नंबरचे आवेदन स्वीकारने, मतदार यादीत फोटो नसेल तर फोटो गोळा करणे, मय्यत नावे यादीतून शोधुन यादी तयार करणे, दुबार नावे शोधून काढणे आदी कामे करतांना जिव धोक्यात टाकुन आपली कामे पार पाडली.

प्रत्येकाच्या घरी जाऊन संपर्क करने, भेटी देणे आदी कामे कोरोना संकट असतांना पुर्ण केले.

अशातच ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असतांनाच बि एल ओ कडे निवडणूकीचे आदेश कार्यालयात धडकले. बि एल ओ चे काम असतांना निवडणूकीचे अतिरीक्त काम देण्यात आले. त्यामुळे शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व संतापाची लाट पसरली आहे. बि एल ओ शिक्षकांना निवडणूक प्रक्रियेतुन मुक्त करण्यासाठी बि एल ओ शिष्टमंडळाने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी कवडू लोहकरे, सुशिल शिरभय्ये, सौ.माया बेले, प्रविण लोहकरे, डि. एम. पराते, एस. एम. सातपुते, लक्ष्मण बेले, डि. एन श्रिरामे , गायधनी आदी उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular