गडचांदुर – मो.रफिक शेख -श्री गुरुदेव सेवा मंडळ, राष्ट्रसंत पुतळा समिती व राष्ट्रसंत बायुवा मंडळाच्या वतीने बिबी येथे पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
दरवर्षी पुण्यतिथी दरम्यान गावातील अनेक गुरुदेव भक्त गुरुकुंज मोझरी येथे दर्शनासाठी जात असत. मात्र कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून गावातच श्रद्धांजलीचा कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. पुण्यतिथीनिमित्त ग्रामसफाई, रामधुन, सामुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थना, नियमित प्रार्थनेला येणाऱ्या ६ मुलांचा सत्कार व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुतळ्याची नियमित स्वच्छता ठेवणारे गुरुदेवभक्त साईनाथ ठाकरे यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमासाठी गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष नामदेव ढवस, सचिव बापूजी पिंपळकर, राष्ट्रसंत पुतळा समितीचे अध्यक्ष देवराव आष्टेकर, आनंदराव पावडे, रामदास देरकर, साईनाथ कुळमेथे, श्रीरंग उरकुडे, कवडु पिंपळकर, दादाजी भेसुरकर, राहुल आसुटकर, शंकर आस्वले, प्रा. आशिष देरकर, निवृत्ती ढवस, चंद्रकांत पिंपळकर, शामकांत पिंपळकर, किसन भडके, मारोती देरकर, राजु पिंपळकर, संजय पिंपळकर, भास्कर भडके, विठ्ठल देरकर, देवराव कोडापे, शेख रशीद, भाऊराव टोंगे, एकनाथ सोनुले, आकाश कोडापे, गणपत टेकाम, नथ्थु काकडे, दामोदर निवलकर, अमोल आत्राम, देवराव पाचभाई, पुरुषोत्तम काळे, कृष्णा झाडे, मंगल सलाम, रामा कोडापे व महिला मंडळींनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन अधिवक्ता सुरज लेडांगे यांनी केले. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.