गॅस कटर च्या साहाय्याने दिवसा ढवळ्या होते चोरी…
लोहा चोरीत सुरक्षा रक्षकही सहभागी?

विदर्भ कल्याण/ प्रतिनिधी:बल्लारपूर वेकोली च्या रेल्वे सायडिंग वरून कोळसा चोरी ही नियमित बाब झाली असतांना भंगार चोरट्यांनी वेकोळीच्या बंद पडलेल्या सिएचपी कडे आपला मोर्चा वळवून वेकोलीच्या लाखो रुपये किमतीचा ‘लोहा’ हजम केला आहे.यातील महत्वाची बाब म्हणजे या भंगार चोरांसोबत कर्तव्यावर असलेले येथील सुरक्षा रक्षक (गनमॅन) आर्थिक देवाणघेवाण करून त्यांना अभय देत असल्याने हे भंगार चोरट्यांनी गॅस कटर च्या साहाय्याने आजपर्यंत लाखो रुपयांची भंगार चोरी केली असल्याचे एकूणच चित्र आहे.दरम्यान दिवसाढवळ्या होणाऱ्या या भंगार चोरी मुळे काही महिन्यातच वेकोलीची बंद पडलेली सिएचपी नामशेष होण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे.
वेकोली चा लोहा आणि कोळसा चोरी होऊ नये म्हणून वेकोली ने महाराष्ट्र सुरक्षा फोर्स चे बंदूकधारी सुरक्षा रक्षक तैनात केले आहे.मात्र हे सुरक्षा रक्षकच चोरांकडून ५ ते १० हजार रुपयांची लाच घेऊन येथील लोहा चोरी करण्यास खुली सूट देत असल्याने गॅस कटर लावून दिवसा ढवळ्या भंगार चोर लाखो रुपयांच्या लोहा चोरी करत आहे.वेकोलीच्या रेल्वे सायडिंग वरून होत असलेली ही लाखो रुपयांची भंगार चोरी कुणाच्या पथ्यावर पडेल?हे सांगता येत नसले तरीही येथील सुरक्षा रक्षक नवनाथ,रोहिदास,आणि बंटी यांच्या ड्युटी दरम्यानच चोरी होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.दरम्यान संबंधित एरिया सेक्युरिटी ऑफिसरनी याची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे.