Saturday, May 28, 2022
Homeचंद्रपुरपोषण आहार अभियान जनजागृती कार्यक्रम संपन्न

पोषण आहार अभियान जनजागृती कार्यक्रम संपन्न

गडचांदुर मो.रफिक शेख! महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सप्टेंबर महिन्यामध्ये दरवर्षी पोषण आहार सप्ताह साजरा केला जातो याचे औचित्य साधून नांदा बाल विकास प्रकल्प कार्यालय कोरपना यांच्या अंतर्गत नांदा येथे अंगणवाडी क्रमांक चार येथे नुकताच जनजागृती असा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी महिला ग्रामपंचायत सदस्य नंदाताई राजू खडसे प्रामुख्याने उपस्थित होत्या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना गरोदर स्त्रिया स्तनदा माता किशोरी मुली अंगणवाडी मध्ये शिक्षण घेत असलेले बाल कि त्यांच्या सुदृढ आरा विषय व आरोग्य विषयी विविध प्रकारची प्रात्यक्षिकासह तयार करून असे खाद्य तयार करून सकस व संतुलित आहाराचे महत्त्व पटवून देण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या वतीने यांच्या माध्यमातून बालकांनी करिता असलेल्या सोयी सुविधांचा लाभ घेण्याचे आव्हान उपस्थितांच्या माध्यमातून करण्यात आले याप्रसंगी नांदा सर्कल मधील अंतर्भूत होत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस प्रामुख्याने उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular