Sunday, May 28, 2023
Homeचंद्रपुरपोलिस नायक मुजावर याचा जिल्हा पोलिस अधीक्षक याचे कडून सन्मानित

पोलिस नायक मुजावर याचा जिल्हा पोलिस अधीक्षक याचे कडून सन्मानित

गडचंदूर – मो.रफिक शेख. चंद्रपूर पोलिस दलात अनेक निरीक्षक,उप निरीक्षक पदावर कार्यरत आहे.ते आप आपल्या ठिकाणी योग्य जबाबदारी बजावत आहेत यातच चंद्रपूर पोलिस दलाच्या सायबर क्राइम ब्रँचचे पोलिस नायक अधिकारी मुजावर कार्यरत आहे त्याची नुकतेच एका चोरी प्रकरणात जवळ जवळ दोन करोड च्या या दरोडा प्रकरणात तक्रार मिळताच अवघा पंधरा तारसात चोरांना पकडुन जेर बंद केले.

त्याचे हे कार्य प्रशशनिय असून त्याच्या कार्याची दखल घेऊन चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी त्यांना कार्यालयात बोलाउन त्याचे पुष्प गुच्छ देऊन त्याचा सन्मान केला. त्याच प्रमाणे चंद्रपूर येथील सामाजिक संस्था खवातीन ए इस्लाम या संस्थे ने दखल घेऊन पोलिस नायक मुजावर याचा त्याचे घरी जाऊन सर्व पदाधिकारी यांनी सत्कार केला या वेळी संस्थेचे अध्यक्ष शाहीन शेख, मलका शेख,नफीसा अंजुम,रजिया सुलताना,मुस्कान शेख व इतर पदाधिकारी यांनी मुजावर यांना त्याच्या कार्याचा गौरव करत त्याचे स्वागत केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
- Advertisment -

Most Popular