भद्रावती-
येथील बगडे वाडीतील रहिवाशी आणि ब्युटिशियन व मेक अप आर्टिस्ट नयना सॅमुल गंधम यांना ओरीसा राज्यातील पुरी येथे ‘इंडियन ग्लोरी अवार्ड’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार स्पर्धेत भारतातील वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील ४० स्पर्धक सहभागी झाले होते.त्यात महाराष्ट्रातील ३ स्पर्धक सहभागी झाले होते. इंडियन ब्युटिशियन वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक राजेंद्र पांडा आणि त्यांच्या चमूने नयना गंधम यांची ‘बेस्ट मेक अप आर्टिस्ट’ म्हणून निवड केली.त्यांना मानाचा फेटा, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, ट्राफी व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.