बल्लारपूर (राहुल गायकवाड)�
मागील दोन वर्षापासुन नगर परिषदेचे कर्मचारी स्वताचा मनाने नवीन नियम लावून जाहिराती काही विशीष्ट वुत्तपत्रास देत आहे .त्यामुळे अनेक वुत्तपत्रावर अन्याय होत आहे.या कडे मुख्यधिकार्या कडे तक्रार केली असता ते पण दूर्लक्ष करित असल्याचा आरोप पत्रकार मंगेश बेले यानी केला आहे.

या संबधी मंगेश बेले नी माहीती अधिकार टाकून कूणा कूणाला जाहीरात दीली याची माहीती मागीतली असता मागील चार महीण्यापासून सदर कर्मचारी टिळाटाळ करित होते.शेवटी अपील चा माध्यमातून माहीती मागीतली असता जी माहिती मागीतलीच नाही त्या माहीती चे कागद देण्यात आल्याने या जाहीरात प्रकरणात खुप मोठी पैशाची उलाढाल तर होत नसेल ना? असा प्रश्न पत्रकाराना पडला आहे.
स्थानिक वुत्तपत्राना महत्वाचा जाहीरात मागील दोन वर्षापासुन मीळत आहे हे वुत्तपत्र कधी निघतात याची माहीती शहरवासीयांना नसते, या वुत्तपत्राचे दहा वीस प्रती निघत असून लोकांन पर्यत पोहचत नाही त्यामूळे नगर परिपदेचा कार्यभार संशयास्पद वाटत आहे. याची पण चोकशी करण्यात यावी. या बाबत संबधीत कर्मचार्याना विचारणा केली असता रिजनल वुत्तपत्राचे भाव जास्त असल्याने नगर परिपदेला परवडणारे नसल्याने आम्ही जाहीरातदेत नसल्याचे बालीश उत्तर देत आहे. असा आरोपही पत्रकार मंगेश बेले यानी केला आहे .या सर्व प्रकरणाची जील्हधिकारी साहेबा कडून चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली.
मागील दोन वर्षापासुन सूरू असलेल्या कर्मचार्याचा मनमानी कारभारा मुळे जे पत्रकाराचै नूकसान झालै त्याची भरपाई कोण करणार, ?अनेक दीवसापासुन सूरु असलेल्या रोस्टर पद्धत बंद करण्याचा अधिकार यांना कोन दीला? लोंकावर अन्याय झाला तर पत्रकार लढतो पण इथे तर चक्क पत्रकारावर अन्याय करण्याची धमक या कर्मचार्यानी दाखवली आता न्याया साठी पत्रकारानाच रस्त्यावर उतरावे लागेल व न्याय मिळवून दोषीवर कार्यवाही होत पर्यत लढा देण्याचा निर्धार मंगेश बेले सह अनेक पत्रकरानी केला आहे