Saturday, July 27, 2024
Homeचंद्रपुरनगर परिषदेचा विविध कामात बेजबाबदारपणा, नागरिकांच्या जिव्हारी - नगरसेवक डोहे

नगर परिषदेचा विविध कामात बेजबाबदारपणा, नागरिकांच्या जिव्हारी – नगरसेवक डोहे

गडचांदूर प्रतिनिधी


गडचांदूर /- कोरपना तालुक्यातील औद्योगिक शहर गडचांदूर,येथील नगर परिषद तालुक्यात सर्वात जास्त लोकसंख्या असलेली नगर परिषद आहेत.शहरात काही ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून लोकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहे.यांना आपले अतिक्रमण नियमानुकुल होण्याची अपेक्षा आहे.याच श्रेणीत येथील प्रभाग क्रमांक 2 व 7 च्या अतिक्रमण धारकांनी त्यांचे अतिक्रमण नियमानुकुल करण्याचे विनंती अर्ज 4 वर्षापूर्वी स्थानिक न.प.कडे केले.मात्र,आजतागायत नगर परिषदेने याविषयीचा प्रस्ताव उपविभागीय कार्यालयात सादरच केला नसल्याची बाब समोर आली आहे.अशा प्रकारे विविध कामात नगर परिषदेचा बेजबाबदारपणा, नागरिकांना मोठी डोकेदुखी ठरत असल्याचे आरोप होत आहे.ही बाब लक्षात घेऊन ‘सदर प्रभागातील अतिक्रमण धारकांचे प्रस्ताव तात्काळ उपविभागीय कार्यालयात सादर करावे,अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल’ असा विनंती वजा इशारा नगर परिषदेत विरोधी पक्ष नगरसेवक अरविंद डोहे यांनी दिला आहे.यासंदर्भात गडचांदूर न.प.मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार,मा.जिल्हाधकारी चंद्रपूर,न.प. नगराध्यक्षा यांनाही निवेदन देण्यात आल्याची माहिती नगरसेवक डोहे यांनी दिली आहे.

प्रभाग क्रमांक 2 व 7,येथील काही रहिवासी गेल्या 30 वर्षापासून शासकिय जागेवर अतिक्रमण करून आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहे.आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांना पक्के घरे बंधने शक्य झाले नाही.त्यांच्याकडे जागेचे मालकी हक्क नसल्याने त्यांना कोणत्याही प्रकारची शासकिय योजना मिळू शकली नाही. ''सर्वांना घरे" असा निर्णय शसनाने घेतला व त्यामध्ये वर्ष 2011 पूर्वीच्या सर्व प्रकारचे शासकिय जमिनी वरील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमनुकुल करून त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देण्याचे स्पष्ट नमूद केल्याचे डोहे यांचे म्हणणे आहे.

 असे असताना त्या अतिक्रमण धारकांने वर्ष 2020 मध्ये नगर परिषदकडे मागणी अर्ज केला.मात्र आज जवळपास 4 वर्षाचा काळ लोटूनही नगर परिषदेने सदर प्रस्ताव उपविभागीय कार्यालयात सादर केलेला नाही.! ही आश्चर्याची बाब असून या कारणांमुळे ते अतिक्रमीत कुटुंब पंतप्रधान आवास योजनेच्या लाभापासून वंचित आहे.! तरी कृपया सदर प्रस्ताव तात्काळ उपविभागीय कार्यालयात सादर करावा अशी विनंती नगरसेवक 'अरविंद डोहे' यांनी नगर परिषदेकडे पत्राद्वारे केली आहे.अन्यथा नाईलाजाने आंदोलन उभारण्याचा इशारा डोहे यांनी दिला आहे.आता नगर परिषद नगरसेवक डोहे यांच्या मागणीला कितपत न्याय देतात याकडे लक्ष लागले आहे.
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular