ब्रह्मपुरी पोलीस विभागातील विशेष पथकाची कारवाई
ब्रह्मपुरी:
प्राप्त झालेल्या गुप्त माहितीनुसार
50 हजार रुपये किमतीच्या दारू साठा व 40 हजार रुपये किमतीच्या एक्टिवागाडी 90 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह ब्रह्मपुरी पोलिस विभागातील विशेष पथकाने संशयित आरोपी विरुद्ध सापळा रचून कबरस्थान जवळील रोडवर दोन आरोपींना अटक केली आहे .
प्राप्त माहितीनुसार 6ऑक्टोंबर रोजी रात्री 11.30 वाजता ब्रह्मपुरी पोलिस विभागातील विशेष पथकांना दोन संशयित आरोपी एक्टिवा गाडीतून दारूची तस्करी करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्या आधारावर आरोपी योगेश मनीराम बुंदेले वय (40) राहणार हनुमान नगर ब्रह्मपुरीआरोपी अमर महिपाल गजभिये वय (32) संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेऊन झडती घेतली असता पोलिसांनी त्यांच्याकडून 90 एम एल च्या सीलबंद 100 नग याप्रमाणे 05 सीलबंद असलेले संत्री दारूच्या पेट्या अंदाजे किंमत 50 हजार ऍक्टिवा मोटर सायकल अंदाजे किंमत40 हजार रुपये असा दोन्ही ऐवज मिळून 90 हजार रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त केला असून महाराष्ट्र राज्य मुंबई दारू बंदी कायदा कलम 65अ 83 नुसार गुन्हा नोंद केला आहे
सदर कारवाई उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे व ब्रह्मपुरी पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाचे निरीक्षक बोरकर यांच्या निगराणीखाली विशेष पथकाने ही कारवाई केली