भद्रावती–
वाघाने ठार केलेल्या बैलाची नुकसान भरपाई शासनाच्या परिपत्रकानुसार मिळावी या मागणीसह विविध मागण्यांना घेऊन ताडोबा वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा देणारे चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती तुळशीराम श्रीरामे यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे.

दि.२५ डिसेंबर रोजी ते परिसरातील नागरिकांसह आमरण उपोषणाला बसणार होते. परंतू ग्राम पंचायत निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्याने आपण उपोषण स्थगित करावे अशी विनंती भद्रावती आणि शेगाव पोलिसांकडून श्रीरामे यांना करण्यात आली.त्यामुळे त्यांनी त्यांनी आपले दि.२५ डिसेंबरचे नियोजित उपोषण स्थगित केले असून आचारसंहिता संपताच सुरु करण्यात येईल असे सांगितले.