जिवती प्रतिनिधी
जिवती /- चंद्रपूर लोकसभा करिता पाडावरील प्रसिद्ध ताजुद्दीन शेख यांनी 26 4 2024 ला आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर दुसरीकडे बीजेपी पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी आपला साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे 27 मार्चला प्रतिभा धानोरकर या शक्ती प्रदर्शन केला आहेत.
ताजुद्दीन शेख यांचा उमेदवारी अर्ज अगदी थाटामाटात भरण्यात आलेला आहे.जिवती तालुक्यातील पहाडावरील बहुतांश अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. विद्यमान नामांकित निशिकांतजी सोनकांबळे येल्हापूर येथील माजी सरपंच सोनेरावजी पेंंदोर कोदेपुर सोसायटी सदस्य जातपात धर्म माणूस न पाहता मी येणाऱ्या लोकसभेमध्ये निवडून आल्यावर लोककल्याणकारी लोकहितासाठी काम करणारा माणूस ताजुद्दीन शेख लोकसभेमध्ये गेला पाहिजे याकरिता मी संविधानिक आधारावरती लोकसभा लढत आहो व मला मतदारांनी या वेळेस संधी देईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. याकरिता मी लोकांच्या हितासाठी लोकांच्या प्रश्नासाठी मी अर्ज दाखल केलेला आहे व येणाऱ्या काळामध्ये जर का मी निवडून आल्यावर तळागाळातील जनतेच्या गोरगरीब जनतेच्या कल्याणकारी हितासाठी कार्य करीन अशी नारा देत ग्वाही देत अर्ज दाखल ताजुद्दीन शेख यांनी केलेला आहे.
यावेळी जिवती तालुक्यातील दिग्गज सामाजिक कार्यकर्ते निशिकांतजी सोनकांबळे यांचा मला मोठा आशीर्वाद आहे व येलापूर येथील सोनेराव सरपंच कोदेपूर सोसायटीचे सदस्य हे माझ्या पाठीशी खंबीरपणे आशीर्वाद देत उभी आहे व जिल्ह्यातील विमुक्त भटक्या जमाती वंचित घटक माझ्या पाठीशी आहे याकरिता मी या निवडणुकीला अर्ज दाखल केलेला आहे.