Friday, April 12, 2024
Homeचंद्रपुरतहसीलदारांचे अफलातून आदेश मंडळ अधिकाऱ्यांची दबंग गिरी

तहसीलदारांचे अफलातून आदेश मंडळ अधिकाऱ्यांची दबंग गिरी

पूर्वसूचनेशिवाय उभ्या पिकात काढला रस्ता शेतकऱ्यांचा टाहो

गडचांदुर -मो.रफिक शेख –
कोरपना येथून जवळ असलेल्या गणेशमोड येथील सर्व्हे. नं. ७६ व ७७ च्या धुर्यावरून गैरअर्जदार यांचे शेत सर्वे नंबर ७४ यांनी रस्ता अडविण्याची तक्रार तहसीलदार कोरपना यांच्याकडे दाखल केली होती. तहसीलदार यांनी याची सुनावणी घेऊन प्रकरण चालविले सदर शेख अहमद शेख रसूल है अल्पभूधारक शेतकरी असून यांचे सर्वे नंबर ७७ ची १.२१ आर हे सात वारसांचा नावाने मालकी आहे उन्हाळी हंगामात कास्त करून या जमिनीत चालू हंगामात कापूस व तुरीचे पीक शेतात असताना तहसीलदार यांची दिनांक ०९/०९/२०२१ रोजीचे रा. मा. क्र.-०७/BND ५४/२१२२ दि. ९/९/२१ रोजी आदेश पारित केले याबाबतच्या आदेशाची प्रत धारकास दिलेच नाही.

व तसेच वनसडी तलाठी यांनी दिनांक २५/९/२१ ला रस्ता खुला करण्यासाठी नोटीस बजावून दि. २७/९/२१ रोजी ११. वा. हजर राहण्याचे सुचवले मात्र तद पूर्वीच मंडळाधिकारी, तलाठी, नगरपंचायत मधील सफाई कामगार व जेसीबी ने उभ्या पिकाची नासाडी करून आर्थिक नुकसान केले सदर गणेशमोड येथील एकत्रीकरण नकाशा चे रस्ता नमूद नसताना जाणून बुजून अल्पभूधारक शेतकऱ्यांवर बेकायदेशीर आदेश पारित करून पंचनाम्यात वहिवाटीचा रस्ता भासवून शेतकऱ्याची मोठे नुकसान केली आहे. तसेच मंडळ अधिकारी यांची भूमिका व धारकास कोणतीही पूर्वसूचना न देता शेतात जेसीबी लावून उभ्या पिकात जेसीबी चालवत उपडा रे पोल असे वक्तव्य नितीन बावणे, कांचनबावणे यांनी पोलिसांसमक्ष पत्रकार त्या ठिकाणी आले असता अबे व्हिडिओ काढू नकोस तू फोटो काढू नकोस असे म्हणत भर पिकात जेसीबी चालविली मंडळ अधिकारी यांनी तहसीलदारांचे आदेश आहे असे म्हणत कापसाची उभे पीक व जेसीबी चालविण्याचे फरमानकरीत नगरपंचायतीचे सफाई कामगार बंडु लसंते .यांच्यासह ५ कामगारकडून संपूर्ण शेताची व पिकाची नासाडी केली. माझ्यावर अन्याय करणाऱ्या गैरअर्जदार व मंडळ अधिकारी, तलाठी, यांनीएकतर्फी कारवाई करून माझे नुकसान केल्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल न झाल्यास माझ्यावर झालेल्या अन्यायाबद्दल कारवाई न केल्यास येत्या ८ ऑक्टोंबर २०२१रोजी तहसील कार्यालय कोरपना पुढे कुटुंबासह आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. मात्र तहसीलदारांच्या अफलातून आदेशामुळे मंडल अधिकाऱ्यांच्या दबंग गिरी मुळे एका गरीब कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. कोणतीही संधी न देता जाणीवपूर्वक नियोजित कट रचल्याचा आरोप शेख अहमद शेख रसूल यांच्या परिवाराने केला आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular