चिमूर : – आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था टेकेपार च्या वतीने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे टेकेपार परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. टेकेपार परिसरात मोठ्या प्रमाणात धानाचे पिक घेतल्या जाते. परिसरातील शेतकऱ्यांना अधिक सोईचे व्हावे यासाठी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था टेकेपार च्या माध्यमातून शासकीय आधारभूत धान खरेदी सुरु करण्यात आले आहे. यावेळी प्रथम धान विक्री करणारे शेतकरी अशोक गणोरकर यांचा संस्थेचा वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष दिलीप गराटे यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ओमप्रकाश गणोरकर , संचालक मनोहर गुळधे, विलास चटपकार, संस्थेचे व्यवस्थापक मंगेश मस्के तथा संस्थेचे विक्रेता श्रीकृष्ण भोयर व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.