Tuesday, July 16, 2024
Homeचंद्रपुरजि.प. लिंगडोह शाळेत विद्यार्थी प्रदर्शनी

जि.प. लिंगडोह शाळेत विद्यार्थी प्रदर्शनी

जिवती प्रतिनिधी
जिवती /- सुरुवातीला गावात प्रभात फेरी काढून शिक्षणाविषयी घोषणा देत, प्रदर्शनाविषयी जनजागृती करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंगडोह येथे विद्यार्थी प्रदर्शनी घेण्यात आली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदयार्थी राहुल राठोड यांनी केले कार्यक्रमाला गावाचे सरपंच मंगेश सोयाम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रदर्शनात शाळेतील विद्यार्थ्यांनी गणित व भाषा विषयाचे वेगवेगळे मॉडेल, चार्ट, ठेवले होते. खेळाचे मैदान , संख्यारेषा, नंबर बॉण्ड ,इत्यादी साहित्याने टेबल सजलेले होते. मुलांनी दोन दोन च्या गटात आपल्या मॉडेल विषयी माहिती सादर केली. यावेळेस पालकांनी उत्साहाने आणि उत्सुकतेने विद्याथ्यांना प्रश्नही विचारले.
कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना भाषा आणि गणित विषयाच्या विविध पद्धतींचे सिखे संस्थेमार्फत प्रशिक्षण दिल्या जाते. आणि त्यानंतर वर्षभर या शिक्षकांना कोचिंग केले जाते. विद्यार्थी या सर्व पद्धतीचा सराव त्यांना दिलेल्या कार्यपुस्तिकेत करत असतात. वर्षाच्या शेवटच्या सत्रात शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत घेतलेल्या या पद्धतींचे वेगवेगळे मॉडेल बनवून प्रदर्शित करतात.

जिवती कोचं विकास नागोसे यांनी सांगितले , तसेच कार्यक्रमास लाभलेल्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ताईबाई पवार यांनी शाळेत सुरू असलेला टीप कार्यक्रम अतिशय विद्यार्थ्यांना उपयोगी आहे आणि प्रत्येक शाळेत असावे असे मत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सुधाकर लोहे, सहाय्यक शिक्षक सुभाष लोढे. यांनी सहकार्य केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular