Friday, April 12, 2024
Homeचंद्रपुरजिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुर्झा(ब्रम्हपुरी) शाळेच्या पटांगणाची दयनीय अवस्था

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुर्झा(ब्रम्हपुरी) शाळेच्या पटांगणाची दयनीय अवस्था

:- शहरी भागातील कुर्झा येथे जिल्हा परिषद.शाळेची अवस्था बघता ग्रामीण भागाचे काय…?

ब्रम्हपुरी :-
मानवाच्या उत्कर्षापासून क्रीडा त्याच्या जीवनाचा एक अमूल्य भाग आहे, मुलांनी बाहेर मोकळ्या हवेत खेळणे हे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी महत्त्वाचे असते, मैदानी खेळ खेळल्याने मुलांच्या आंतरिक कौशल्याचा विकास होतो व त्यांचे स्वास्थ्य ठीक राहून वाढ झपाट्याने होते, सरकार ने शैक्षणिक बाबतीत मुलांचे भवितव्य उज्वल करण्यासाठी मोफत सरकारी शाळा काढल्यात तर सोबत पटांगण उपलब्ध करून देत मुलांचे सर्वांगीण विकास साधण्याचे प्रयत्न केले मात्र कुर्झा वार्ड ब्रम्हपुरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणा वर
मोठ-मोठे खाचखडगे,तणशीचे ढीगार, जनावरे, वाहनं,शेणाने पटांगणाचे तीन-तेरा वाजल्याचे निदर्शनात येत आहे.

पटांगणावरील दयनीय अवस्थेत बाबत विचारणा केली असता मुख्याध्यापिका समर्थ मॅडम व शिक्षक श्री तिघरे यांनी,आम्ही सूचना देऊनही अतिक्रमण धारक, अतिक्रमण काढायला तयार नाही व उर्मट वागतात त्यामुळे आम्ही त्यांना विचारणे सोडले. स्थानिक नगरसेवकाकडे सहकार्य मागितले असता त्यांनी शालेय परिसराच्या बाहेरील भागात रस्ता व नाली चे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पटांगणाचा विषय मार्गी लावू असे आश्वासन दिल्याचे सांगितले.

एकंदरीत सदर समस्येची कुठेही लेखी तक्रार दिल्याचे शाळा समिती तर्फे निदर्शनात येत नाही, तर वरिष्ठांकडे कुठलीही तक्रार दिल्याचे स्पष्ट होत नाही. कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याने पटांगण परिसरात घाण आणी गंदगी चे साम्राज्य वाढत असून,शालेय मुलांच्या मूलभूत हक्काशी व आरोग्याशी खेळण्याचा अक्षम्य गुन्हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुर्झा वार्ड ब्रह्मपुरी येथे होतं आहे

संबंधित गंभीर समस्येकडे तालुका व जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून आळा घालावा अशी मागणी कुर्झा वार्डातील नागरिकांकडून होत आहे

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular