ब्रह्मपुरी
चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सौ.प्रज्ञा पाटील यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्ष मा.ना.जयंत पाटीलसाहेब,उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार, व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या निमंत्रक मा.खा.सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा कु.सक्षणा सलगर यांनी केली.सौ.प्रज्ञा पाटील यांना आज चंद्रपूर येथे नियुक्तीपत्र जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्र वैद्य यांच्या हस्ते देण्यात आले.याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्षा सौ.बेबीताई उईके,महापालिकेचे गटनेते श्री.दीपक जयस्वाल,महापालिकेच्या गटनेत्या सौ.मंगला आखरे,विधानसभा अध्यक्ष श्री सुधाकर कातकर,सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.सुनील दहेगावकर,महिला विधानसभा अध्यक्ष ज्योतीताई रंगारी,माजी नगरसेवक संजय वैद्य व श्री.राजेंद्र आखरे,जिल्हा उपाध्यक्ष सौ.रश्मी झोटिंग,विधानसभा उपाध्यक्ष सौ.पूजा शेरकी,विधानसभा सचिव श्रीमती रेखाताई जाधव उपस्थित होते.