Wednesday, April 24, 2024
Homeचंद्रपुरजागतिक अमली पदार्थ विरोधी दिन साजरा

जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन साजरा

ब्रम्हपुरी : देशात आज अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यां तरुण तरुणींच्या प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

अनेकांनी आपला जीव गमावला आहे.त्यांचे संपूर्ण आयुष्य विस्कळीत होऊन नैराश्यमय जगताना दिसतात कुटुंब बर्बाद झाली.याचाच परिणाम गुन्हेगारी प्रवृत्ती वाढताना दिसते. ही देशासाठी समाजासाठी तसेच कुटुंबासाठी चिंतेची बाब आहे.अमली पदार्थांच्या सेवनाने व्यक्तीच्या, शरीरावर होणारे दुष्परिणाम कसे होतात त्याचे नुकसान कसे होतात याची माहिती बालमनावर होऊन त्यांना सावध करून निर्व्यसनी पिढी घडावी म्हणून शासन आपल्या स्तरावरून अमली पदार्थ विरोधी दीन साजरा करीत असतो. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक ७ जुलै ला स्थानिक डॉ. आंबेडकर विद्यालय ब्रम्हपुरी येथे “अमली पदार्थ विरोधी दिन” साजरा करण्यात आला .यानिमित्ताने सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली . विचारमंचावर मार्गदर्शक म्हणून पोलिस विभागाचे वाहतूक पोलीस राहुल लाखे ,पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत डांगे ,विद्यालयाचे मुख्याध्यापक टी.जी.चाचरकर सर ,पर्यवेक्षक विनायक नन्नावरे सर, ज्येष्ठ शिक्षिका शेळके मॅडम इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरडकर सर यांनी केले .तर आभार प्रदर्शन राठोड सर यांनी केले. प्रमुख अतिथीनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम ,सामाजिक, आर्थिक जीवनावर होणारे परिणाम याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याने होणारे परिणाम दर्शविणारे चित्र काढून जनजागृती विद्यार्थ्यांत केली.या कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद ,शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular