◻️▪️ शेतकऱ्यांच्या मोर्चाला रोखण्याचा पोलिस विभागाचा प्रयत्न !
चंद्रपूर प्रतिनिधी

जबरान जोत शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी व विविध मागण्यांसाठी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांच्या नेतृत्वात शेकडों शेतकऱ्यांनी आज सोमवारला सकाळी वनमंत्र्याच्या गृह कार्यालयावर मोर्चा काढला. चंद्रपूर पोलिस प्रशासनाने मधातच मोर्चाला अडविण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी पोलिस प्रशासनाचा मान ठेवत जिल्हाधिका-यांना सादर केले.
सोमवार दि.१० जुलैला स्थानिक गिरनार चौक येथे सकाळी १० वाजता पासून अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वनवासी यांना जमिनीचे पट्टे मिळण्याच्या संदर्भात तसेच वन विभागाकडून होणारा त्रास कमी करून शेतकऱ्यांनी टाकलेल्या दाव्यांचा निकाल लागत नाही तो पर्यंत वन विभागांनी शेतकऱ्यांना शेती करण्यापासून अडवू नये असा जिल्हाधिकारी यांचा आदेश असतानाही वन विभाग शेतकऱ्यांना नाहक त्रास देत आहे. याबाबत वारंवार तक्रारी व निवेदने देऊनही वन विभाग व संबंधित प्रशासन कोणतीही कारवाई करत असताना दिसत नाही . वन मंत्र्यांना सर्व माहीत असूनही हेतू पूरस्पर वनमंत्री शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. ही बाब अतिशय गंभिर असून वनमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी आज वनमंत्र्यांच्या कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त करुन नारेबाजी करत हे आंदोलन केले. जाचक तीन पिढ्यांची अट रद्द करण्यात यावी, वन हक्क कायद्यानुसार आदिवासी, गैर आदिवासींना लवकरात लवकर पट्टे देण्यात यावे.जंगल लगत आदिवासी, दलित लोकांवर होणारे अन्याय अत्याचार थांबवून त्यांना न्याय देण्यात यावा जंगलाच्या सर्व शेतकऱ्यांना हिंस्र प्राण्यांपासून शेतीला व स्वतःला वाचवण्यासाठी सोलर कु़पन द्यावे, अशा विविध मागण्यांना घेऊन हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. पोलिस प्रशासनाने मोर्चाला रोखल्यामुळे संघटनेचे अध्यक्ष राजु झोडे, विठ्ठल लोनबले, सुभाष ताजने,प्रेमदास बोरकर, श्याम झिलपे,संपत कोरडे,तृणाली धोंदरे,सुलोचना कोकोडे,टेकाम, शंकर आस्वले,संजय भड़के,बंडु रामटेके आदींनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना एक लेखी निवेदन दिले तदवतचं उपरोक्त मागण्या तात्काळ मान्य करण्याची मागणी केली. जर वरील मागण्या मान्य झाल्या नाही तर याही पेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संबंधित विभागाला देण्यात आला असल्याचे राजू झोडे यांनी आज या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.