चिमूर :
- राज्य निवडणुक आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई संदर्भीय वाचा क्रमांक. 1 नुसार माहे एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित करण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणूकिच्या कार्यक्रम दिनांक.11/12/2020 पासून जाहीर झाली असल्याने आचार संहिता लागू करण्यात आली असून व निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहणार आहे.त्या अनुषंगाने आचार संहिता भंग होणार नाही त्याकरिता आज दिनांक.
15/12/2020 ला तहसील कार्यालय चिमूर येथे आमसभा घेण्यात आली यावेळी पत्रकार तथा सर्व पक्षीय नेते यावेळी उपस्थित होते. माहे जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामंपचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगा मार्फत दिनांक 11 डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्द करण्यात आलेला आहे. त्यानुसार चिमूर तालुक्यातील 85 ग्राम पंचायत निवडणूक होत असून चंद्रपूर जिल्हयातील एकूण 629 ग्रामपंचायतींची मुदत संपलेली आहे, सदर निवडणूकांसाठी दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी आवश्यक असल्यास मतदान घेण्यात येणार आहे. संबंधित ग्रामपंचायतीमध्ये दिनांक 11 डिसेंबर 2020 पासून आचारसंहिता लागू झाली आहे असे चिमूरचे तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणकीकृत (Online) पध्दतीने नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात येणार आहे, नामनिर्देशन पत्र भरण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाचे वेबसाईट (https://panchayatelection.maharashtra. gov.in/) वर उपलब्ध आहे.
नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबरपर्यंत या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 23 ते 30डिसेंबर2020 या कालावधीत स्वीकारली जातील.शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 31 डिसेंबर 2020 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल.
उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दिनांक 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावयाचा आहे दरम्यान (दिनांक 25, 26 व 27 डिसेंबर 2020 या तीन दिवस सलग सार्वजनिक सुट्या आल्या आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 5 दिवसांचा कालावधी मिळणार आहे तेव्हा संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत स्विकारण्यात येणार आहे. संगणकीकृत (Online) पध्दतीने नामनिर्देशन पत्राची प्रत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करणे आवश्यक असल्याचे तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. राखीव जागेच्या प्रभागातील उमेदवार यांना जात प्रमाणपत्र पळतानी समितीकडे प्रस्ताव सादर केल्याची पावती /टोकन जोडणे आवश्यक असून तालुक्यात 85 ग्राम पंचायत निवडणूक होत असून संपूर्ण जिल्ह्यात ग्राम पंचायतची निवडणूक आचारसंहिता लागू आहे.