Friday, April 12, 2024
Homeचंद्रपुरचार वर्षांत अडीच हजार रुग्णाला रक्तपुरवठा। ( रक्तदान हेच श्रेष्ठदान )

चार वर्षांत अडीच हजार रुग्णाला रक्तपुरवठा। ( रक्तदान हेच श्रेष्ठदान )


पारडगावं येथिल मंगल या युवकाने केले हे कार्य

ब्रम्हपुरी: ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव येथील रक्तपेढीचे अध्यक्ष मंगल पारधी व त्याची चमू यांनी रक्तदान हेच श्रेष्ठदान या मणी चे आदर्श डोळ्यासमोर ठेवून सतत रक्त दान करण्याचे काम दि.४०/१२/२०१८ पासून रक्त पेढी व्हॉटअप ग्रुप तयार करून रक्त पुरवठा करण्याचे निःस्वार्थ व बिना शुल्क काम करीत आहेत.गेल्या चार वर्षांपासून अडीच हजार रुग्णाला रक्त पुरवण्याचे काम सुरू आहे. आज मात्र विजय दिवठे वरिष्ठ तंत्रज्ञ वीज वितरण केंद्र गांगलवाडी यांचं आज छत्तीस वा जन्म दिवस असल्यामुळे त्या निमित्त त्यांनी आपल्या जीवनामध्ये आज पंधरावी वेळ गरजू गरीब रुग्णांना रक्तदान करून एक समाज सेवेचे ज्योत तेवत ठेवली त्या बद्दल त्यांचे खुप खुप आभार मानले आहे. रक्त पेढी ग्रुपचे सर्व सदस्य आपल्या वाढदिवसा निमित्ताने व छत्रपति शिवाजी महाराज तसेच महापुरुषाच्या जयंती ,पुण्यतिथी निमित्य रक्तदान कार्य करीत आहेत. त्याच्या कार्याचा तालुक्यातील कौतुक व अभिनंदन केले जात आहे.


वरिष्ठ तंत्रज्ञ विज वितरण केंद्र गांगलवाडी चे विजय दिवटे यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त छत्तीस वेळा रक्तदान केल्यामुळे त्याचे रक्त पेढी च्या सर्व सदस्याने अभिनंदन केले. यावेळी मंगल पारधी रक्तपेढी अध्यक्ष पारडंगाव,सुधीर(बालू) पिलारे (उपसरपंच) , सुभाष भाऊ बगमारे,गणेश मेश्राम, रूचीत वनस्कर,दीपक मेश्राम,महेश अनोले ,गणेश पारधी,अक्षय दोणाडकर,अक्षय राऊत,निलेश राऊत,शरद मैंद,विकास अनोले,विकास मेश्राम,आदित्य राऊत,हीवराज तुपट,छगन तुपट,अमित सोनटक्के,आदित्य तोंडरे,सूरज ठेंगरी, समित राऊत,भूषण बगमारे,आदी समस्त रक्तदाते पारडंगाव उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular