Saturday, June 15, 2024
Homeचंद्रपुरचंद्रपूर ते पडोली,धानोरा,भोयगाव मार्गे गडचांदूर बस सुरू करा प्रहार ची मागणी

चंद्रपूर ते पडोली,धानोरा,भोयगाव मार्गे गडचांदूर बस सुरू करा प्रहार ची मागणी

गडचांदूर:-
गडचांदूर वरून चंद्रपूर जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी भोयगाव मार्ग,कमी खर्च व कमी वेळेचा मार्ग असल्याने नागरिक याच मार्गाला पसंती देतात.पुर्वी हा रस्ता अत्यंत खराब,खड्डेयुक्त होता,बस फेऱ्या बंद होत्या.आता मात्र सिमेटीकरण करण्यात आले असून संपूर्ण रस्ता उत्तम झाला आहे.याच पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोईनुसार पुन्हा बस सेवा सुरू करणे गरजेचे असताना याकडे मात्र कोणीही लक्ष देत नसल्याने लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.बस अभावी लोकांना होणारा नाहक त्रास व सुरू असलेली मागणी लक्षात घेता प्रहार जनशक्ती पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर यांनी 28 नोव्हेंबर रोजी थेट विभागीय वाहतूक अधीकारी व आगार प्रमुख चंद्रपूर यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.


गडचांदूर हे औद्योगिक शहर असून बरेच नागरिक सकाळी विविध कामा निमित्य चंद्रपूर जिल्ह्याच्या ठिकाणी जातात.रात्रीच्या सुमारास लवकर घरी येण्यासाठी भोयगाव मार्गे गडचांदूरकडे येण्यासाठी महामंडळाची बस नाही.पुर्वी 1 बस गचांदूर येथे हल्टिंग राहत होती.याच बरोबर नियमितपणे दिवसाला 2 फेऱ्या होत होत्या.परंतू मागील अंदाजे 3 ते 4 वर्षापासून ह्या बसेस पुर्णपणे बंद करण्यात आल्या आहे.परिणामी नाईलाजाने लोकांना चंद्रपूर वरून वाया बल्लापूर,राजुरा,असं जवळपास 60 किमी लांब पल्ल्याचा प्रवास करत गडचांदूर गाठावे लागते.यात वेळही जास्त आणि पैसाही जास्त लागत असल्याने विनाकारण लोकांवर मनस्ताप सहन करण्याची नामुष्की ओढावली आहे.या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून येत्या 8 दिवसाच्या आत चंद्रपूर ते पडोली,धानोरा,भोयगाव मार्गे गडचांदूर,अशा दिवसातून 3 ते 4 बस फेऱ्या व 1 हल्टिंग बस सुरू करावी,अन्यथा प्रहार जनशक्ती पार्टीतर्फे आपल्या आगारात तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर,यांनी निवेदनातून दिला आहे.यासंदर्भात विभागीय वाहतूक अधिकारी व आगार प्रमुख राज्य परिवहन महामंडळ चंद्रपूर,यांना निवेदन देण्यात आला आहे.निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आल्याची माहिती देण्यात आली असून आता यापुढे काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular