चांदा शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित जनता कॉन्व्हेंन्ट शाळा घुग्घुस येथे रक्षाबंधन अवचित्य साधून वृक्ष संवर्धनाची शपथ झाडांना राखी बांधून घेण्यात आली.

सहाय्यक शिक्षिका कु.निशा रामटेके यांनी चिमुकल्या विद्यार्थिंनील्या सांगितले कि भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जात असलेला राखी पौर्णिमेचा सण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून झाडांना राखी बांधून सणांचे महत्व पटवून देण्यात आले. यातील काही राख्या झाडांना बांधण्यात आल्या. झाड आपणाला आक्सिजन, सावली, फळे, फुले देते पण तोच खरा माणसाचा आधार आहे. याची जाणीव ठेऊन आम्ही झाडालाच भाऊ समजून राखी बांधली असं या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं.
यावेळी कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका कु.निशा रामटेके, प्रस्तावना स्वाती बुच्चे व आभार सौ.सुनंदा बावणे यांनी मानले.
या कार्यक्रमांमध्ये सर्व शिक्षिका तसेच विद्यार्थींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेवुन कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता संगिता पेठकर, संगीता खाडे,संगीता समर्थ ,मंगला नागतूरे यांनी परिश्रम घेतले.