घुग्गुस प्रतिनिधी

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त तथा मासिक वर्तमानपत्र सत्यशोधक च्या पाचव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर व अति प्रदूषित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घुग्घुस शहरात सोमवार 6 डिसेंबर रोजी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. चंद्रपूर येथील लालपेठ कॉलरी नं 1 व घुग्घुस येथील पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, चिंतामणी कॉलेज, जनता कॉलेज, प्रियदर्शनी कन्या विद्यालय, प्रथमेश कॉन्व्हेंट येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी डी.एस. ख्वाजा, प्रतिमा ठाकूर, राजू शंभरकर, पो.नि. राहुल गांगुर्डे, नौशाद शेख, देवानंद ठाकरे, पंकज शर्मा, प्रियंका शर्मा, फिरदोस शेख सहा. पो.नि संजय सिंग, वाहतूक पोलीस लोखंडे, चौधरी, अवधेश ठाकूर, श्यामु कनकम, देवा कुंटा व वेकोली कामगार उपस्थित होते.