घुग्गुस : येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भारतरत्न श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन सत्कार प्रतिभावंतांचा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा युवामोर्चा महामंत्री विवेक बोढे, माजी सरपंच राजकुमार गोडसेलवार, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, भाजपा नेते मल्लेश बल्ला, बबलू सातपुते, प्रयास सखी मंच अध्यक्ष सौ. किरणताई बोढे, माजी ग्रामपंचायत सदस्य वैशालीताई धवस मंचावर उपस्थित होते.
प्रमुख पाहुन्याचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
प्रास्ताविक भाषणात प्रयास सखी मंच अध्यक्ष सौ. किरणताई बोढे म्हणाल्या महिलांच्या सक्ष्मीकरना साठी प्रयास अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापन घुग्गुस येथे करण्यात आली. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगारा साठी कर्ज देण्यात येते यातून महिलांना आपली प्रगती करता येणार व आत्मनिर्भर तेच्या दिशेने वाटचाल करता येणार आहे असे प्रतिपादन व्यक्त केले.
यावेळी भाजपा युवामोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे म्हणाले महिलानी आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिभावंतांचा सत्कार करताना अतिशय आनंद होत आहे. प्रतिभावतांचा सत्कार करून भारतरत्न श्रद्धेय अटलजी यांना श्रद्धांजली देत आहो. अटलजीच्या विचारावर चालून देश प्रगती करून सुजलाम सुफालम होणार. बचत गटाचा माध्यमातून कर्ज देण्यात येते यातून महिलांनी स्वतः चा रोजगार व उद्योग उभा करावा. यातून महिलांना आत्मनिर्भर ते कडे पाऊल टाकता येणार असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन सौ. पूजताई दुर्गम माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी केले.
तर आभार सुनंदा लिहितकर संचालिका सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता निशा उरकुडे, प्रीती धोटे, सोनू बहादे, प्रिया नागभीडकर, मोहनीश हिकरे, उमेश दडमल व गौरव ठाकरे यांनी प्रयत्न केले.