उमेदवारांची होत आहे तारांबळ
दैनिक विदर्भ कल्याण
चिमुर
ग्राम पंचायत च्या निवडणूक प्रकिया सुरू आहे परंतु उमेदवाराना नवीन बँक खाते काढणे अनिवार्य अट असल्याने तालुक्यात बँक कमी असल्याने उमेदवारांची तारांबळ होत आहे तेव्हा प्रशासनाने नवीन बँक खातेची अट शिथिल करून जुने बँक खाते ग्राह्य धरण्याची मागणी भाजयुमो जिल्हा माजी उपाध्यक्ष तथा माजी उपसरपंच प्रफुल कोलते यांनी केली आहे.

ग्राम पंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू असून उमेदवाराना उमेदवारी नामांकन अर्ज सादर करीत असताना नवीन बँक खाते असणे आवश्यक असल्याची अट आहे तेव्हा उमेदवाराना नवीन बँक खाते काढण्यासाठी तारांबळ होत आहे अनेक उमेदवार वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासनाने दखल घेत नवीन बँक अट शिथिल करून जुनेच बँक खाते ग्राह्य धरण्याची मागणी माजी उपसरपंच प्रफुल कोलते यांनी केली आहे.