Monday, May 27, 2024
Homeचंद्रपुरग्रामपंचायत निवडणुकीत भाजपात फूट

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपात फूट

चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील भोयगांव ( भारोसा ) येथील भाजपात सरळ सरळ दोन गटात विभागणी झाल्याचे चित्र दिसत असून जिल्हा कार्यकारणी सभासद तसेच माजी मंत्री श्री हंसराज अहिर यांचे खंदे कार्यकर्ते श्री नथुजी ढवस यांनी कॉग्रेस सोबत युती करून ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजविण्याचे संकेत मिळत आहेत.

राजुरा विधानसभाच्या निवडणुकीत नथुजी ढवस यांनी खुलेआम विधानसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार एड. संजय धोटे यांच्या विरोध करून कॉग्रेसचे सुभाष धोटे यांच्या प्रचार करून त्यांना निवडून आणण्यास सिहांचा वाटा उचललेला दिसतो, तिच पुनरावृत्ती आता ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून येत आहेत. प्राथमिक चर्चेत भाजपातील तीन जागेवर लढत असून 6 जागेवर कॉग्रेस लढत असल्याचे आज चिन्ह दिसत आहेत. तर माजी सरपंच बंडू जुनघरे शेतकरी संघटनेसोबत युती करून भाजपा चार जागा घेत उर्वरित पाच जागा कॉग्रेस लढणार आहे अशी चर्चा जोरात रंगत आहेत. माजी सरपंच बंडू जूनघरे यांना सरपंच पदावरून हटवण्यात शेतकरी संघटनेचे धुरंधर रवींद्र गोखरे माजी सभापती तसेच सरपंच सूर्यभान पोतराजे, नथुजी ढवस (भाजपा ), श्री दिनकर टाले माजी सरपंच, बंडूजी चौधरी यांनी प्रामुख्याने पुढाकार घेऊन सरपंच पदा वरून हटविण्यात संयुक्त आघाडी स्थापन केलेली होती. त्याचे शेतकरी संघटने सोबत बंडूजी जुनघरे माजी सरपंच हे युती करून ग्रामपंचायत निवडणूक लढत आहे. यांचे जनमाणसात आश्चर्य व्यक्त करीत आहेत या अभद्र युती ने संपूर्ण कोरपना तालुक्यात चर्चेला पेव फुटले आहे. या भाजपच्या फाटाफुटीचे माजी मंत्री हंसराज अहिर व माजी आमदार संजय धोटे काय भूमिका घेणार थोड्याच दिवसात दिसून येईल.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular