प्रशांत राऊत,
(वार्ताहर)अर्हेरनवरगाव:-
जिल्हाभऱ्यातील ६२९ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केले असून ब्रम्हपुरी तालुक्यात ६८ ग्रामपंचायतींची निवडणूक तयारी सुरू झाली असून गावनेत्यांकडून निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे.त्यामुळे गावपातळीवरील राजकीय नेते सक्रिय झाले असून यांच्यात एकमेकांविरुद्ध दंड थोपटले जात आहे.
ग्रामपंचायत निवडणूक लोकसंख्येच्या आधारावर कमीतकमी ७ तर जास्तीत जास्त १४ सदस्य संख्येच्या आधारावर होणार असून निवडणूक आयोगाने निवडप्रक्रिया झाल्यानंतर आरक्षण जाहीर करण्यात येत असल्याने राजकीय नेत्यांच्या धाबे दणाणले आहेत जाहीर होणारे आरक्षण कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले असून राजकीय तर्क लावून स्थानिक राजकीय नेते उमेदवाराची निवड करत आहेत.ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व प्रस्थापित व्हावे यासाठी कटाक्षाने प्रयत्न केला जात आहेत.ग्रामपंचायत निवडणुकीमुळे शहरात राहणारे नेत्यांनी गावाकडची वाट घेतली असून मुक्काम ठोकला असल्याचे दिसून येते.मी नाही तर माझी पत्नी असा कावकाव सरपंच पदासाठी सुरू आहे काहींच्या बाबतीत मात्र थेट घरणेशाहिवर राजकारण सुरू असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे पिढ्यानपिढ्या ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व ठेवणार्या राजकीय नेत्यांना मात्र आता चांगलाच कस लागणार आहे.ठीकठिकानी रात्री-बेरात्री बैठक घेऊन राजकीय डावपेच ठरविल्या जात आहेत जेणेकरून आपल्याच उमेदवारांनी निवडणुकीत बाजी मारली पाहिजे व आपलीच सत्ता प्रस्थापित झाले पाहिजे या उद्देशाने निवडणुकीची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे.
तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून ही निवडणूक गावनेत्यांनी परीक्षा घेणारी ठरणार असून या निवडणुकीच्या यश-अपयशावर पुढाऱ्यांची राजकीय भविष्य ठरणार असल्याने सर्व राजकीय पुढारी ताकदीने तयारीला लागले आहेत.होणाऱ्या निवडणुकीत माजी सरपंच,उपसरपंच ,सदस्य रणांगणात उतरणार आहेत की काय असा प्रश्न सर्वत्र निर्माण झाला आहे मागील निवडणुकीत काही राज्यकर्त्यांनी ‘खाओ पिऊ ऐश करो’अशी भूमिका घेतल्याने सर्वसामान्य लोकांना याचा त्रास सहन करावा लागला मात्र पुढे असे होऊ नये आपला नेता कसा असावा हे कळून चुकले असल्याने या निवडणुकीत सामान्य नागरिकांनाही चांगलाच रस चढू लागला आहे.
अशी असणार ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया
तालुक्यातील 68 ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाने घोषित केल्या असून ११ दिसेम्बर २०२० पासून आदर्श आचारसंहिता घोषित करण्यात आल्या आहेत.निवडणूक आयोगाने नेमून दिलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्र मागवण्याचा व सादर करण्याचा दि.२३-१२-२०२० ते ३०-१२-२०२० वेळ सकाळी ११.०० ते दु. ३.०० या कालावधीत,नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दि.३१-१२-२०२९ ला सकाळी ११.०० वाजतापासून,नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा दिनांक ४-१-२०२१ दुपारी ३.०० वाजेपर्यंत,निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा व अंतिम यादी जाहीर करण्याचा दि.०४-०१-२०२१ दुपारी ०३.०० वाजता नंतर व मतदानाचा दि.१५.०१.२०२१ सकाळी ०७.३० ते सायं.०५.३० पर्यंत अशी निवडणूक आयोगाने निवड प्रक्रिया जाहीर केली आहे