Saturday, July 27, 2024
Homeचंद्रपुरगडचांदूर व्यापारी असोशियनचा कोरोना विरुद्ध लढण्याचा निर्धार

गडचांदूर व्यापारी असोशियनचा कोरोना विरुद्ध लढण्याचा निर्धार

गडचांदूर- मो.रफिक शेख –
कोरोना महामारीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत लागलेल्या लॉकडाउनमुळे सर्वच व्यापारी बंधूना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला , तर अनेक व्यापाऱ्याचे निधन झाले.मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी आम्ही सज्ज असून शासन निर्देशाचे पालन करीत लसीकरणाचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी शहरातील समस्त व्यापारी बंधूना प्रेरित करून ,प्रत्येक व्यापारी बंधूना मास्क- सॅनिटायझर – सोशल डिस्टंसिंग चा वापर करण्यासाठी आग्रह धरू .आणी शासनाच्या ‘ मी जबाबदार /स्वयंशिस्त ,संयम व दक्षता ‘ या घोषवाक्याचे पालन करून शासनाला सहकार्य करू असा निर्धार गडचांदूर व्यापारी असोशियन तर्फे करण्यात आला आहे .


व्यापारी असोशियन गडचांदूरच्या दि.20 सप्टेंबर रोजी ,हॉटेल चांदणी चौक गडचांदूर येथे झालेल्या सभेत हा निर्धार करण्यात आला . सभेला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद खत्री ,सचिव विवेक पत्तीवार , गडचांदूर व्यापारी असोशियनचे अध्यक्ष हंसराज चौधरी , सचिव प्रशांत गौरशेट्टीवार ,उपाध्यक्ष धनंजय झांजेळ उपस्थित होते . छोटेखानी झालेल्या सभेत व्यापारी बांधवाना येणाऱ्या विविध अडचणीवर चर्चा करण्यात आली. सभेला रवि गेल्डा ,मनोज भोजेकर , राजू सचदेव , जावेद मिठाणी , सलीम भाई , चंदू वडस्कर , शिरीष भोगावार ,विठ्ठल वैद्य , प्रशांत दरेकर , मारोती चापले सचिन निले आदी व्यापारी बंधू उपस्थित होते .

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular