गडचांदूर,,,
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती गडचांदूर येथे वंजारी समाजा च्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या सदस्या ,माजी सभापती सौ,गोदावरी ताई केंद्रे होत्या, प्रमुख अतिथी म्हणून सुरेश केंद्रे,प्रा, अशोक डोईफोडे, डॉ, माधवराव केंद्रे,अंगद केंद्रे,रामदास बढे,निवृत्ती नागरगोजे, सौ,नलिनी केंद्रे,सौ,प्रभा डोईफोडे होत्या, सर्वप्रथम उपस्थित अतिथी व समाजबांधवाणी संत भगवानबाबा,व लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,
सुरेश केंद्रे यांनी आपल्या भाषणातुन गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनचरित्र वर प्रकाश टाकला, वंजारी समाजाच्या तसेच इतर समाजाच्या उन्नतीसाठी गोपीनाथ मुंडे यांनी संपूर्ण जीवन अर्पण केले, वंजारी समाज आज सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर आहेत ते केवळ गोपीनाथ मुंडे यांच्या मूळे च असल्याचे सांगितले, प्रा, अशोक डोईफोडे यांनी आपल्या मनोगतात वंजारी समाजाला आरक्षण गोपीनाथ मुंडे यांनी मिळवून दिल्या मुळे आज सर्व क्षेत्रात समाज प्रगतीपथावर असल्याचे सांगितले, रामदास बढे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले,प्रास्ताविक धनंजय घुले यांनी केले,,संचालन काकासाहेब नागरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कृष्णा गर्जे यांनी केले,
याप्रसंगी लक्ष्मण मिसाळ, धर्मराज मुंढे,विष्णू बढे,महादेव कायंदे, भगवान नागरगोजे, वाघ,सिद्धेश्वर लटपटे, गजानन तिडके, निळकंठ केंद्रे,बालाजी कागणे,संजय केंद्रे
तथा इतर सहपरिवार उपस्थित होते,
,,,,,,,,,,,,,,
गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त वंजारी समाजाच्या वतीने स्थानिक जिजामाता बालसुधारगृहात वॉर्डन वैशाली मडावी यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनी ना सॅनिटायझर,मास्क,व सॅनिटरी पॅड तसेच मिठाई चे वाटप करण्यात आले,,,,