गडचांदुर.मो.रफिक शेख.-
दिनांक 11/10/2021 ला आंतरराष्ट्रीय मुलगी दिवस व गट साधन केंद्र,पंचायत समिती राजुरा,चे दिशादर्शक नेतृत्व मा.श्री विजयजी परचाके ,गटशिक्षणाधिकारी यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून, ‘कोविड 19’ या साथीच्या काळात स्वयंप्रेरणेने गाव पातळीवर विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापनात सहकार्य करणाऱ्या राजुरा तालुक्यातील
विशाल मनोहर शेंडे वरूर रोड,कु.शैला जयपाल मडावी,मंगी बु.,सौ.मंगला शालीक दुबे श्रीरामपुर,
सतीश वारलुजी कुळमेथे,सौ.कुंदा योगेश्वर भलवे,कोहपरा,कु. अभिलाषा मेघशाम बोबडे,अक्षय किसन टेकाम ,हरदोना खुर्द,तिलक परशुराम पाटील ,नोकारी बु,कु.नाजूका लटारू जगताप साखरवाही,आणि कु.प्रियंका विठ्ठल ठमके धानोरा इत्यादी 10 शिक्षणप्रेमी/संवयसेवक यांचा गट साधन केंद्र राजुरा च्या वतीने ,गट साधन केंद्र,राजुरा येथे प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री विजयजी परचाके,
गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती,राजुरा हे होते तर प्रमुख अतिथी,म्हणून मा.श्री केवलराम डांगे ,मुख्याध्यापक श्री शिवाजी विद्यालय राजुरा,मा.श्रीराम मेश्राम,मा.संजय हेडाऊ,मा.मनोज गौरकार,इत्यादी विस्तार अधिकारी शिक्षण व संपूर्ण सन्मा.परचाके परिवार हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे उत्तम प्रास्ताविक मा.श्रीरामजी मेश्राम साहेब, गटसमनव्यक तथा विस्तार अधिकारी शिक्षण यांनी केले.सर्व मान्यवरांनी,मा.श्री केवलराम डांगे सर व मा.श्री विजय परचाके साहेब यांनी अतिशय प्रेरणादायी मार्गदर्शन केले.मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला फुले दाम्पत्यांचा वारसा पुढे चालवावा लागेल असे आवाहन या सूंदर सोहळ्यात करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन श्री मुसा शेख, व कु ज्योती गुरनुले ,साधनव्यक्ती यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री राकेश रामटेके सर साधनव्यक्ती यांनी केले.अनेक शिक्षण प्रेमींनी आपले मनोगत व्यक्त केले. मा. श्री विजय परचाके साहेब यांचा वाढदिवस अत्यंत अनोख्या पद्धतीने, आनंदमयी वातावरनात साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमास सर्व केंद्रप्रमुख, सर्व साधनव्यक्ती, समावेशित शिक्षण तज्ज्ञ,विशेष शिक्षक,डाटा एन्ट्री ऑपरेटर,रोखपाल,मंगी बु येथील प्रतिष्ठीत नागरिक श्री वासुदेव जी चापले ,ग्रामसेवक श्री वंजारी सर ,श्री रत्नाकर भेंडे सर व इतर शिक्षकांची उपस्थिती होती.सदर कार्यक्रमाचे उत्कृट आयोजन मा.श्री विजय जी परचाके साहेब यांच्या नेतृत्व व मार्गदर्शन मध्ये गट साधन केंद्र ,पंचायत समिती,राजुरा येथील संपुर्ण विस्तार अधिकारी, सर्व साधनव्यक्ती, सर्व समावेशीत तज्ज्ञ, विशेष शिक्षक,श्री रत्नाकर भेंडे सर व इतर कर्मचारी ,यांनी सहकार्य केले.