ब्रम्हपुरी:-स्थानिक ख्रिस्तानंद स्कुल अँड ज्युनिअर काँलेज येथे ख्रिस्तमस कार्यक्रम मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन विद्यालयाचे व्यवस्थापक फादर जोसेफ कलथ्थिल,प्रमुख अतिथी म्हणुन फादर चाको,मुख्याध्यापिका सिस्टर दिपा जोस,सिस्टर बोनी मारिया प्रामुख्याने उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या निमित्याने विद्यालयातिल विद्यार्थ्यांनी ख्रिस्तमस वर आधारित विविध रंगारंगी नृत्य,नाटक,गाणे सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली.तसेच या निमित्याने,विद्यालयात शैक्षणीक सत्र २०२१-२२ मध्ये आयोजित विविध क्रिडा तसेच सांस्कृतिक स्पर्धेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना अतिथिंच्या हस्ते बक्षिस प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष फादर जोसेफ कलथ्थिल तसेच प्रमुख अतिथि फादर चाको यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन वैष्णवि बरडे,पल्लवी मेश्राम,शितल भावे,रुबिना सय्यद यांनी तर स्वागत मारिया वांढरे हिने केले तर आभार प्रदर्शन पृथ्वीराज कामडी यांनी केले.कार्यक्रमाला विद्यालयातील विद्यार्थी ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.